लोहारा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाची उदया निवड .

0
196

लोहारा ता.पाचोरा दि. २५ ( ज्ञानेेश्वर राजपुत ) : –
लोहारा ग्रामपंचायतीच्या  सरपंच,उपसरपंच पदाची निवड उदया २६ जुलै शुक्रवार रोजी होणार आहे .पदांच्या अपात्र होणाच्या राजकीय कुरघोडयांमुळे ही निवड आता अतिशय प्रतिष्ठेची बाब झाली आहे . येथे एक गट जरी बहुमताचा दावेदार असला तरी या गटातून सहल वारीचे भाग्य ग्रामपंचायत सदस्यांना लाभल्याची जोरदार चर्चा गावात आहे .सहलीवर गेलेले सदस्य उदया लोहारा गावात केव्हा दाखल होणार याकडे गाावकरी बांधवांचे लक्ष लागले आहेे . सदय स्थितीत येथील  ग्रामपंचायत प्रशासनावर प्रशासक विराजमान असुन उदया या गावाला नवे कारभारी लाभणार आहेत .     जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक कैलास चौधरी यांच्या गटाचा सरपंच होईल हे चित्र आज जरी स्पष्ट झालेले असले तरी राजकाारणात काहीही घडु शकते हे नाकारता येणार नाही. त्यामुळे उदया कोण सरपंच उपसरपंच होणार ? या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 − four =