लोहारा सरपंचपदी मालती पाटील , उपसरपंचपदी कैलास चौधरी . पालकमंत्र्यांचे पीआरओ अरविंद देशमुख यांची मध्यस्थी यशश्वी .

0
537

लोहारा दि .२६ ( ज्ञानेश्वर राजपुत) :- पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या व माजी विकासो चेअरमन संजय पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ.मालती संजय पाटील तर उपसरपंचपदी भाजपचे कार्यकर्ते कैलास संतोष चौधरी हे 11 विरुद्ध 6 मतांनी आज झालेल्या विशेष सभेत विजयी झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुऱ्हाड मंडळ अधिकारी विनोद कुमावत हे होते. तर त्यांना तलाठी नदीम शेख, ग्रामविकास अधिकारी आर.टी.बैसाने यांनी सहाय्य केले. यावेळी सरपंच-उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेला एकूण 17 ग्रामपंचायत सदस्य हजर होते. दरम्यान, पालकमंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे निवड निर्विघ्नपणे पार पडली.

सरपंच पदासाठी मालती संजय पाटील, चित्रा राजेंद्र क्षिरसागर, विमलबाई हिरालाल चौधरी यांनी अर्ज दाखल केले. तर उपसरपंच पदासाठी कैलास संतोष चौधरी, अक्षय जैस्वाल, नथ्थू अहिरे यांनी अर्ज दाखल केले. तर माघारीच्या वेळेत सरपंचपदासाठी चित्रा क्षिरसागर यांनी माघार घेतली तर उपसरपंच पदासाठी नथ्थू अहिरे यांनी माघार घेतली. त्यामुळे सरळ लढत होवून सदस्यांचे गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात आले. यात सरपंच पदासाठी मालती संजय पाटील यांना 11 मते पडली तर विमलबाई चौधरी ह्या पराभूत झाल्या त्यांना 6 मते पडली. तर उपसरपंच पदासाठी कैलास चौधरी व अक्षय जैस्वाल यांच्यात सरळ लढत होवून कैलास चौधरी यांना 11 मते पडली तर अक्षय जैस्वाल पराभूत झाले त्यांना 6 मते मिळाली. त्यामुळे सरपंचपदी मालती पाटील तर उपसरपंचपदी कैलास चौधरी हे विजयी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 11 =