४’ ऑगस्ट रोजी स्कॕपल फाऊंडेशन,पुणे तर्फे जामनेर शहरामधे गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन.

0
90

जामनेर दि .२८(प्रतिनिधी) : – पुणे येथील स्कॕपल फाऊंडेशन हे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते.याचाच एक भाग म्हणून दि.४’अॉगस्ट-२०१९(रविवार) रोजी सकाळी-11ः00 वाजता. जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी निवास सभागृहामध्ये इ.१०’वी,१२’वी तसेच पदविधर विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते आकर्षक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच बंजारा समाजातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या समाजसेवक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांना फाऊंडेशन तर्फे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक-मा.सुभाषभाऊ देशमूख(गटविकास अधिकारी) तर अध्यक्ष-मा.डॉ.एन.एस.चव्हाणसर हे असून प्रमुख अतिथी-मा.गजानन राठोडसाहेब(DYSP-भुसावळ),मा.आत्मारामभाऊ जाधव(राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय बंजारा टायगर्स),मा.मदनभाऊ जाधव(राष्ट्रीय उपाध्यक्ष-राष्ट्रीय बंजारा टायगर्स),मा.कांतिलालभाऊ नाईक(राष्ट्रीय अध्यक्ष-अ.भा.बंजारा सेना),मा.चरणदास पवार(राष्ट्रीय उपाध्यक्ष-अ.भा.बंजारा सेना),मा.अंबरसिंग चव्हाण(प्रदेश महासचिव-अ.भा.बंजारा कर्मचारी सेवा संस्था),मा.डि.सी.राठोड(सेवानिवृत्त कामगार अधिकारी-बृहन्मुंबई महापालिका),मा.सुभाषभाऊ तंवर(समाजसेवक),इ.समाजातील मान्यवर व समाजसेवक उपस्थित राहणार आहेत.
तरी जामनेर तालुक्यातील बंजारा समाजामधील सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन स्कॕपल फाऊंडेशन चे अध्यक्ष-नामदेवराव चव्हाण,सचिव-सुमित चव्हाण,सरचिटणीस-डॉ.श्याम चव्हाण,खजिनदार-लालचंद चव्हाण यांनी केले आहे.

*टिप-ः गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व नाव नोंदणीसाठी-१).प्रविण राठोड(9970748787),२).सचिन चव्हाण(9552092027),३).मंगल राठोड(८४११९९०८०२),४).मोहित राठोड(८३८०८७०२४१). या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − one =