सरस्वती फोर्ड चे संचालक मुकेशजी टेकवाणी यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा .

0
277

जळगाव दि .२८ ( मिलींद लोखंडे ) : – सरस्वती डेअरी व सरस्वती फोर्डचे संचालक,पुज्य सिंधी सेंट्ल पंचायतचे अध्यक्ष अत्यंत निगर्वी, शिस्तप्रिय लोकप्रिय,यशस्वी उद्योजक मा.मुकेशजी टेकवाणी यांचा ५९ वा वाढदिवस पर्यावरण पूरक,सृष्टी सौंदर्यात भर घालणारे “वृक्षारोपण” करून साजरा करण्यात आला. यावेळी सिंधी सेंट्ल पंचायतचे सर्व पदाधिकारी,लाडी लोहाणा सिंधी पंचायत जळगाव शहर पूज्य सिंधी पंचायत वृक्षस्नेही पदाधिकारी,महाराष्ट्र वनश्री पुरस्कार विजेते विजयकुमार वाणी यांच्यासह साधारणतः ३०० लोकांच्या व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोर्डच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. १९५१ मध्ये नवीपेठ जुन्या शाळेच्या गल्लीत सरस्वती डेअरीचे रोपटे लावले जो आज सरस्वती डेअरी व सरस्वती फोर्ड व सरस्वती एन्टरप्राईजेस या स्वरूपात मोठा महाकाय ” वृक्ष ” बनला आहे.सरस्वती समूहाने ग्राहकांचा विश्वास संपादन करून,दिवसेंदिवस उद्योग क्षेत्रात केवळ खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केला आहे.आपणही निसर्गाचे देणे लागतो. असा विचार करून या समाजोपयोगी अत्यंत महत्त्वपूर्ण वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्साहवर्धक वातावरणात , सरस्वती फोर्ड परिसरात करण्यात आले. काळाची गरज ओळखून,बिघडलेला “निसर्गाचा समतोल ” सुधरावयाचा असेल तर ! वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सरस्वती फोर्डच्या परिसरात आंबा,गुलमोहर,जांभूळ,पेंरूसह,इतर विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सरस्वती डेअरी व सरस्वती फोर्डचे संचालक धवलजी टेकवाणी,पूजा टेकवाणी,भावना टेकवाणीसह संपूर्ण टेकवाणी परिवारासह सरस्वती डेअरी व सरस्वती फोर्ड परिवाराने संपूर्ण सिंधी पंचायत यांनी मुकेशजी टेकवाणी यांच्या यशस्वी कारकीर्दीकरिता व दीर्घायुष्याकरिता शुभेच्छांचा वर्षाव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen + 3 =