शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात नामदार गिरीश महाजन यांचा पुढाकार . राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन .

0
873
  • जळगांव दि .२८ ( मिलींद लोखंडे ) : -महाराष्ट्र राज्यातील 38 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर ,राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे आदींनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांचे सोबत दिनांक 27 शनिवार रोजी रात्री नऊ वाजता जळगाव येथे शिष्टमंडळाची चर्चा करून महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख वस्तीशाळा शिक्षक राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक ज्युनियर कॉलेज विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न तसेच आदींच्या प्रश्नासंदर्भात नामदार गिरीश महाजन साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली , चर्चेअंती ना . गिरीश महाजन यांनी शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नांसंदर्भात सकारात्मक विचार करून हे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन राज्य शिक्षक समन्वय समिती शिष्टमंडळाला दिले आहे . यासाठी महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयकमहाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझर कर यांनी पुढाकार घेतला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी दिनांक 30 रोजी मंगळवारी मंत्रालयात यावे आपण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार ऍड आशिष शेलार यांच्यासोबत त्यांची चर्चा घडवून आणू असे ठोस आश्वासन यावेळी नाममदार गिरीश महाजन यांनी राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझर कर व शिष्टमंडळाला दिले यावेळी राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना इतर शासकीयपुरस्कार प्राप्तपुरस्कार प्राप्त व्यक्ती प्रमाणे एसटी बस सवलत कुटुंबियांसह मोफत मिळण्याचा प्रश्न 100% निकाली काढू व इतर प्रश्न ही सकारात्मक विचार करू असे आश्‍वासन नामदार महाजन यांनी दिले या शिष्टमंडळात पदवीधर संघटनेचे अध्यक्ष गिरीश वाणी पदवीधर संघटनेचे महिला मुंबई अध्यक्षा मीना पगारे केंद्रप्रमुख संघटनेचे विलास बतीसे, अरुण जाधव इलाहुजुदिन फारुकी अनिता परमार जळगाव जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय श्रीखंडे कैलास तायडे डॉक्टर विजय बागुल महेश पाटील केंद्रप्रमुख रवींद्र लालगे समाजसेवक किशोर पाटील ढोमनेकर किशोर पाटील धुळे सतीश शिंदे अण्णा चौधरी मनोज माळी बाबुराव पवार आदींसहय 42 जणांचा समावेश होता
    दरम्यान 30 रोजीमंगळवारी मंत्रालयात होणाऱ्या राज्यातील सर्वस्तरीय शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्यस्तरीय बैठकीला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष राज्य सरचिटणीस व शिक्षक बांधव यांनी सकाळी अकरा वाजेपर्यंतउपस्थित रहावे असे आव्हान राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझ रकर यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + 3 =