जामनेर दि .२८ ( मिलींद लोखंडे ) : -जामनेर येथील आनंदयात्री आणि जळगाव येथील परिवर्तन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर नगरीत पहिल्यांदाच तीन दिवसांचा विशेष सांस्कृतिक महोत्सव संपन्न होत आहे.
पुणे,मुंबई येथे गाजलेले नाटके, संगीत कार्यक्रम व साहित्य विषयक घडामोडी आपल्याही शहरात व्हाव्यात या साठी आनंदयात्री ही संस्था काम करत आहे.
या तीन दिवसांच्या महोत्सवास २ आगष्ट पासून सुरुवात होत असून ४आगष्ट पर्यंत कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे.
पहिल्या दिवशी दि २ ऑगष्ट २०१९ शुक्रवार रोजी संध्या ६:३० वाजता
‘अमृताची गोडी’
हा ८००वर्षाच्या मराठी कवितेचा संगीतमय समृद्ध प्रवास सांगणारा संगीत कार्यक्रम संपन्न होईल, या कार्यक्रमाचे
दिग्दर्शिन मंजुषा भिडे यांचे असून परिवर्तन चे कलावंत हा कार्यक्रम सादर करतील.या कार्यक्रमाचे या आधी महाराष्ट्रभर १७ प्रयोग झाले आहेत.