समन्वयाने काम करुन कामाच्या बळावर आपली ओळख निर्माण करा . -जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

0
287

जळगाव.दि. २ ( मिलींद लोखंडे ) : -कार्यालयात असो किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना वरिष्ठ-कनिष्ठांमध्ये समन्वय असल्यास आपण आपल्याकडे मोठ्या आशेने काम घेवून आलेल्या नागरिकांना यथाशिघ्र त्यांचे काम करून त्यांना न्याय देवू शकतो. शिवाय आपल्यालाही त्याचे आत्मीक समाधान मिळते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी महसूल दिनानिमित्त नियोजन भवनात आयोजित उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थित सत्कारार्थी अधिकारी –कर्मचाऱ्यांना उद्देशून केले.

जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे पुढे म्हणाले की, बदल हा जसा सृष्टीचा नियम असल्ल्याचे आपण मान्य करतो अगदी त्याचप्रमाणे काळानुरूप आपल्याही विभागात बदल होत आहेत आणि याही पुढे होत राहतील ते आपण कामाचा वाढलेला व्याप म्हणून नव्हे तर नवीन शिकण्याच्या वृत्तीतून आव्हान म्हणून स्विकारले पाहिजे. महसूल खात्यात प्रत्येक घटक सारखाच महत्वाचा असून ग्रामपातळीवर तलाठी हा तर जनता आणि प्रशासन तसेच शासनातला महत्वाचा दुवा आहे. तलाठी हा विशेष चाकोरीबद्ध मानसिकतेत कधीच गुरफटला नसल्याने त्याच्याकडून ग्रामस्थांच्या खुपच अपेक्षा असतात आणि तो घटकही त्यांच्या अपेक्षा पुर्तीला सदैव्य पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो.

महसूल खात्यातील कोतवाल ते अधिकारी सर्वांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करावी. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या कामाचा निपटारा प्रत्येक वेळी तात्काळ करणे शक्य नसले तरी त्याचे समाधान होईल असे त्याला उत्तर देणे, योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा. कर्मचारी अधिकाऱ्यांनी काम करित असतांना जबाबदारीला प्राधान्य देत असतानाच संयम व सुरक्षेला प्राध्यान्य देण्याचेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात 2002 पासून सुरू झालेल्या महसूल दिनाच्या संकल्पनेबद्दल विस्तृत माहिती सादर करून अगदी ब्रिटीश शासनापासून ते आजतागायतचे महसूलचे काम आणि जनमानसातील ह्या विभागाचे स्थान याचा लेखा-जोखा मांडला.

अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी कामाचे योग्यप्रकारे नियोजन व मुल्यमापन केल्यास सत्कार, सन्मान व पुरस्कार आपल्यापासून दूर जावू शकत नाही असे सांगितले.

मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ. पंजाबराव उगले, जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, तहसिलदार ज्योती देवरे, मंडळ अधिकारी श्री.भंगाळे, लिपीक रविद्र माळी यांची मार्गदर्शनपर भाषणे झालीत.

सत्कारार्थी अधिकारी कर्मचारी खालीलप्रमाणे
प्रांताधिकारी, पाचोरा राजेंद्र दिलीप कचरे ,जामनेरचे तहसिलदार नामदेव दत्तात्रय टिळेकर, चोपडयाचे नायब तहसिलदार राजेश माधवराव पऊळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील लघुलेखक (उच्च श्रेणी) शरद पांडूरंग वाणी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अवल कारकून विलास आनंदा हरणे, जळगाव प्रांत कार्यालयातील अवल कारकून अतुल अरूण सानप, यावल तह‍सिल कार्यालयातील रविंद्र भगवान माळी, भुसावळ तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकारी शशीकांत जनार्दन इंगळे, भडगाव तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकारी महेंद्र निंबा पाटील, चाळीसगाव तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकारी सचिन मानसिंग मोरे, लिपीक संवर्गातील सुरेश सोळंके, किरण राजेंद्र मोरे, श्रीमती अलका गंगाराम साबळे, तलाठी संवर्गातील सुधाकर एस पाटील, भरत रमेश पारधी, श्रीमती मिना बहादुर तडवी, वाल्मिक सिताराम पाटील, हेमंत लक्ष्मण महाजन, अविनाश दत्तात्रय लांडे, प्रविण सुभाष महाजन, धनराज वैजनाथ मुंडे, कैलास बहीर, जगदीश शिरसाठ, विनोद बारी, शशिकांत सुर्यकांत पाटील, दिपक हिम्मतराव गवई, पुरूषोत्तम शिवाजी पाटील, गणेश वासुदेव पारिसे, बसवेश्वर बाबुराव मजगे वाहन चालक ताराचंद महारू बावीस्कर, शिपाई सुरेश गोसावी, उद्धव नन्नवरे, सुदाम चौधरी, नौशाद अली, कोतवाल – पंढरी गोबा कांबळे, अमोल पाटील, पंढरीनाथ अडकमोल, लक्ष्मण न्हावी, प्रकाश अहिर विजय भोसले आणि संजय भिल या एकूण 41 अधिकारी –कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामाबद्दल गुणगौरव करण्यात आला.

याप्रसंगी निवडणूक उप जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, श्रीमती शुभांगी भारदे, पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, रोहयोचे उप जिल्हाधिकरी प्रसाद मते, गौण खनिजकर्म अधिकारी दिपक चौव्हाण, प्रांताधिकारी दिपमाला चौरे, तहसिलदार मंदार कुलकर्णी, मिलींद कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, कैलास चावडे, ज्योती देवरे, गणेश मरकड आदि अधिकारी तथा उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी, सत्कारार्थी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 + four =