GM NEWS, लक्षवेधी वृत्त: स्थानिक सीसीआय केंद्र सोडुन जामनेर कापूस खरेदी केंद्रावर कापूस मोजणीस शेंदूर्णीच्या शेतकऱ्यांचा विरोध . सीसीआय केंद्रावर लावण्यात येणाऱ्या अवास्तव कापूस कपातीवर आक्षेप

0
443

शेंदूर्णी,ता.जामनेर,दि,15 ( विलास पाटील ) : – शेंदुर्णी येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर सीसीआयचे धोरणानुसार कापूस मोजतांना शेतकऱ्यांच्या कापसाच्या दर्जानुसार प्रति क्विंटल २ ते ३ किलो घट लावणे अपेक्षित असतांना स्थानिक केंद्र प्रमुख प्रदीप पाटील हे सरसकट ७ ते ९ किलो पर्यंत प्रति क्विंटल घट लावत असल्याने शेतकऱ्यांची प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये केंद्र सरकारच्या अधिकृत कापूस खरेदी केंद्रावर लूट केली जात असल्याने व ग्रेडिंग करतांना ग्रेडर मनमानी करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे . केंद्र प्रमुख ग्रेडर प्रदीप पाटील हे शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करू शकले नाही तसेच कापूस खरेदी करतांना कापसाचे दर्जानुसार किती घट लावता येते याचे स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला होता तेव्हा बाजार समिती सभापती संजय पाटील,संजय दादा गरुड, खलसे यांनी शेतकऱ्यांची समजून घातली व नियमानुसार घट लावून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे ठरले आहे.येथिल सीसीआय कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी या मागणीसाठी शेंदूर्णी परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या १० दिवसांपूर्वी शेंदूर्णी बाजार समितीचे गेट समोर एकच गर्दी केली होती परंतु गेटला कुलूप असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला त्यानंतर बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील यांचे आदेशाने टोकन साठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठीचे फार्म ज्ञानेश्वर मापारी यांनी स्वीकारले तेव्हा शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता व आपली कापूस विक्रीची चिंता मिटली असा समज शेतकऱ्यांना झाला होता परंतु त्यांचा हा समज जामनेर बाजार समितीचे धोरणाने तेव्हा गैरसमज ठरला जेव्हा शेंदूर्णीत कापूस खरेदी केंद्रावर शेंदूर्णी व परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी व मोजणी करण्याऐवजी जामनेर तालुक्यातील अन्य गावाचा कापूस शेंदूर्णी सीसीआय केंद्रावर मोजण्यासाठी जामनेर बाजार समिती कडून टोकन दिले जात असल्याचे निदर्शनास आले व शेंदूर्णी येथिल शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी जामनेर सीसीआय केंद्रावर जाण्यासाठी टोकन देण्यात आले त्यामुळे शेंदूर्णी येथील शेतकऱ्यांचा संताप झाला त्यांनी या विषयावर बाजार समितीचे सभापती व सचिवांकडे तक्रारी करून जाब विचारले असता आज जामनेर बाजार समितीचे सभापती संजय देशमुख यांनी उपबाजार आवार शेंदूर्णी येथे राष्ट्रवादीचे नेते संजय दादा गरुड, भाजपचे अमृत खलसे, गोविंद अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते प्रविण गरुड, जिनिंग प्रेसिंग संचालक राजेंद्र पवार ,यांच्यासह शेतकऱ्यांची बैठक घेतली त्यात शेंदूर्णी परिसरातील शेतकऱ्यांना जामनेर व जामनेर परिसरातील शेतकऱ्यांना शेंदूर्णी येथे कापूस विक्रीसाठी पाठविल्याने शेतकऱ्यांना ३,४ हजारांचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे निदर्शनास आणून दिले तसेच आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली त्यावर साधक बाधक चर्चा होऊन तोडगा काढतांना शेंदूर्णी परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस शेंदूर्णी केंद्रावर मोजण्यासाठी प्राधान्य देण्याचे ठरले आहे आजच्या बैठकीत शेतकऱ्यांचे समाधान करण्यात आल्याचे जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील यांनी सांगितले