GM NEWS, चिमुकल्या विद्यार्थ्यासाठी महत्वाचे वृत्त: मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका ! चिमुकल्यांसाठी ‘एससीईआरटी ‘चा उपक्रम . प्रथम संस्थेचे सहकार्य .

0
1771

पहूर, ता . जामनेर ,दि.१५ ( शंकर भामेरे ) : – लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांना गोष्टी ऐकण्याचा आनंद घेता यावा ,यासाठी
प्रथम संस्थेच्या मदतीने आजपासून *मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका* ही सुविधा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था , पुणे यांच्या मार्फत उपलब्ध करून देत असल्याची माहिती संचालक दिनकर पाटील यांनी दिली .
संस्कारक्षम गोष्टी बालमनावर खोलवर परिणाम करतात . गोष्टी ऐकण्यातून मिळालेली संस्कारांची शिदोरी आपल्या कायम उपयोगी पडत असते . त्यामुळे सदर स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे . यासाठी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असलेला फोन असण्याची आवश्यकता नाही, तर साध्या फोनवरूनसुद्धा ही सुविधा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल. त्यावर आपण मराठी भाषा निवडण्यासाठी 3 दाबा. मग 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 1 व 5 वर्षांवरील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 2 दाबा आणि गोष्टींचा आनंद घ्यावा , असे आवाहन करण्यात आले आहे .

*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.
08033094243

‘एससीईआरटी ‘ ने सुरू केलेल्या ‘ मिस कॉल द्या गोष्ट ऐका ‘ या उपक्रमात केंद्रातील सर्व शिक्षकांनी आपापल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे . प्रथम संस्थेच्या सहकार्याने सुरू झालेल्या उपक्रमातून चिमुकल्या बालमनावर सुसंस्कार रुजविले जातील .

भानुदास तायडे ,
केंद्रप्रमुख ,पहूर केंद्र