अशोक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ललितग्रंथास सिन्नर येथील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहिर .

0
373

जाामनेर दि.२ ( मिलींद लोखंडेे ) : – जामनेर येथील रहिवासी व महाराष्ट्रातील प्रसिद्ध ग्रामीण  लेखक तथा खानदेशी तावडी बोलीचे अभ्यासक , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक कवी डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या *अशानं आसं व्हतं* या ललितग्रंथास महाराष्ट्र साहित्य परीषद शाखा सिन्नर येथील उत्कृष्ट वाडःय राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे .

एक सप्टेंबर रोजी मान्यवरांचे हस्ते सिन्नर येथील समारंभात हा पुरस्कार वितरीत केला जाणार आहे .
डॉ.कोळी हे ग्रामीण जीवनाचे उत्कृष्ट भाष्यकार असून त्यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण परीसर व तेथील मानसांच्या सुखदुःखाचे मनोभावे वर्णन आपल्या लेखनातून केलेले आहे . कूड , कुंधा , पाडा या सारख्या त्यांच्या रचना वाचकप्रिय ठरल्या आहेत . शालेय अभ्यासक्रमातील त्यांच्या कथा – कविताही विद्यार्थीप्रिय आहेत.
*अशानं आसं व्हतं* हे पुस्तक पुणे येथील नामांकीत आशा साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेले असून त्यात अस्सल खानदेशी तावडी बोलीतील पंचविस लेख आहेत .त्यातून त्यांनी खानदेशी ग्रामीण जीवन अनोख्या पद्धतीने रेखाटलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 + 9 =