बोहरा सेंट्रल स्कुलच्या विदयमाने लोकमान्य टीळकांना अभिवादन .

0
133

जामनेर दि.२ ( प्रतिनिधी ) : -स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच , असे इंग्रजांना ठणकावुन सांगत भारत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात सिंहाचा वाटा असणारे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी बोहरा सेंट्रल स्कुलच्या वतीने त्यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली .
१ ऑगस्ट 2019 रोजी लोकमानय टिळक पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार बोहरा यांच्या उपस्थीती मधे करण्यात आले होते . या प्रसंगी मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले .
या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील जागृती वाघ , समर्थ पालवे , आकाश कुमावत , वैभव गीते , धीरज गीते , विवेक ठाकरे , हर्षल राजपुत या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्यावर माहिती देणारे त्यांचे मनोगत सुध्दा व्यक्त केले . या सोबतच संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल कुमार बोहरा तसेच मुख्याध्यापिका सौ.वैशाली मोरे यांनी सुध्दा विदयार्थ्याना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वांगेकर सरांनी केले. कार्यक्रमाला बोहरा सेंट्रल स्कुलचे शिक्षक -शिक्षीका , शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 16 =