माणुसकी रुग्ण सेवा व्हाँट्सप गृप तर्फे जळगाव जील्हातील पाळधी सह ८ शाळेत १०११ विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य भेट.

0
262

पाळधी / लोहारा दि .३ ( योगेश कोळी / ज्ञानेश्वर राजपुत ) :- समाजातील “तूमचे तुम्ही , आमचे आम्ही
जगण्याचं आज गणित झालंय,माणुसकीतला ‘मी’ माझ्यातली “माणुसकी’शोधणं,
म्हणूनच आज कठीण झालंय”.
या ओळीतल्या भावार्थाप्रमाणे समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतुन समाजसेवक सुमित पंडित यांनी जानेवारी २०१८ मध्ये सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेची सुरूवात केली. या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच सलुन सेवा मोफत , बेवारस निराधारांना स्वच्छ करुन कामाला लावले. आतापर्यंत ६८९ लोकांना महाराष्ट्रभर फिरुन न्याय दिला आहे.
रुग्ण सेवेत नेहमी माणुसकी गृपच्या माध्यमातून ते शासकीय रुग्णालयात कितीतरी अपघातग्रस्त रुग्णांसाठी देवदुत बनले आहे.स्वताच्या खिशाला झळ सोसून फक्त औषधी व रक्तासाठी पैसै नाही म्हणून, विक्रीला काढलेले ७ महिलांचे मंगळसूत्र वाचविले आहे.
संस्थेच्यावतीने दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविले जातात. या नविन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम, “बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमा अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. खरोखर गरज असणाऱ्या आणि ज्या ठिकाणी अन्य संस्थांची मदत पोहचत नाही अशा ८ शाळांची निवड सुमित पंडीत यांनी केली आहे.१ आँगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील ८ जि.प. प्राथमिक शाळासह कन्या शाळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी सोशल मिडीयावर ‘माणुसकी व्हाँट्सअँप समुहामधील’ दानशूरांनी शैक्षणिक साहित्य जमा करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. यातून ८ शाळांतील तब्बल १०११ विद्यार्थ्यांना रजिस्टर,वह्या,पेन, पेन्सील,खोड रबर तसेच गरजवंताना दप्तर,चाॕकलेट या साहीत्यांची कीट भेट देण्यात आलीे.एका दिवसात ८ शाळांमध्ये शालेय साहित्य वितरणाचे नियोजन करण्यात आले होते. यातील जिल्हा परीषद प्राथमिक व कन्या शाळांची नावे खालील प्रमाणे आहेत.
जि.प.प्रा कन्या शाळा मुलीचीं शेंदुर्णी,जि.प.प्रा.मुलांची शाळा शेंदूर्णी,जि.प.प्रा.शाळा बाहेरपुरा शेंदुर्णी, जि.प.प्रा.ऊर्दू शाळा ईदगाह शेंदुर्णी ,जि.प.प्रा.शाळा फुकटपुरा शेंदूर्णी,
जि.प.प्रा.कन्या शाळा कळमसरा,
जि.प.प्रा.कन्या शाळा लोहारा,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळधी येथील गरजवंत शाळांचा समावेश होता।
पाळधी येथील जि प शाळेत सुद्धा शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित माणुसकी ग्रुप संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित,नीता पाटील प.स सभापती जामनेर,
गजानन क्षिरसागर अध्यक्ष माणुसकी रुग्णसेवा ग्रुप जळगाव,राजू भोई निर्माता व अभिनेता,अण्णा सुरवाडे केसांवर फुगे फेम गायक व अभिनेता,
नितिन पाटील अभिनेता ,ईश्वर पाटील महाराज, विनोद कोळी, दत्ताञय माळी, दिलीप चौधरी, मनोज नेवे,विकास माळी,दत्तात्रय तेली,सोपान न्हावी, रवींद्र क्षीरसागर,गोपाल वाणी,यासह मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 5 =