पुणे दि .४ ( मिलींद लोखंडे ) : – महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा *द रॉयल किंग & क्वीन पुणे 2019* फॅशन शो ने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.सहज एव्हेंट ऑर्गनाझेशन मार्फत हा शो अण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा येथे आयोजीत करण्यात आला होता.या शो चे आयोजन कास्टिंग दिग्दर्शक नितिन झगरे अन माधवीताई व्यवहारे यांनी केल होतेे.
या फॅशन शो साठी महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धत जामनेर तालुक्यातील चिंचखेडा या गावातील नितीन पाटील या युवकाने शाईनींग पर्सनालीटीचा प्रथम क्रमांकाचा अवार्ड पटकाविला आहे . नितीन पाटील या युवकाला केसावर फुगे फेम अण्णा सुरवाडे यांनी त्यांच्या अल्बम मधे अभिनेता म्हणून संधी दिली असुन येत्या १५ ऑगष्ट रोजी या अल्बमचे प्रसारण होणार आहे . पुणे येथे पार पडलेल्या या फॅशन शोचे अतिशय काटेकोर नियोजन नितिन झगरे यांनी केले होते .
आतापर्य्ंत कधीच एवढा मोठा शो अवघ्या महाराष्ट्रात झाला नव्हता.ना भूतो ना भविष्यती असा हा विक्रम आहे. महाराष्ट्रातील एक विक्रमादित्य म्हणून नितिन झगरे कडे बघितले जातेय.
संपूर्ण शो चे आयोजन नितिन झगरे आणि माधवी व्यवहारे यांनी केले, प्रोडक्शन हेड़ अजय पेचे आणि प्रिया वाबळे, ऑफिसियल ग्रुमिंग पार्टनर योगिता दारबस्तवार ,अँकरिंग पार्टनर मयूर अभ्यंकर सर यांनी केले…
या शो साठी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मिस्टर, मिस,मिसेस असे या शो चे स्वरुप होते,
शायनींग पर्सनालीटी म्हणून नितीन पाटील प्रथम तर फॅशन शो मधे रेणूका ठाणगे, तेजस्विनी साळुंखे, मनिषकुमार गायकवाड विनर ठरले, तर तेजस साळुंखे, ह्रिया पाटील,संजविनी गवई प्रथम तर धनश्री विसपूते, प्रतिक्षा अहिरे, रोहीत शिंदे द्वितीय आलेत.
परीक्षक म्हणून मिसेस इंडिया इंटरनॅशनल मंजुषाताई मुळीक, कविता मगरे, सुप्रिया चौरसिया, प्रद्न्या भालेराव यांनी परीक्षण केले
या शो साठी पोलिस महासंचालक मा. विट्ठल जाधव सर, आमदार मा.जगदीश मुळीक साहेब,सुवर्ण पदक विजेती अथ्यलटीक्स पट्टू मा.सोनियाताई शिंदे, अभिनेत्री राधिका पाटील, दिग्दर्शक रामकुमार शेडगे सर, दिग्दर्शक प्रकाश पवार सर,अभिनेता सुभाष यादव, वरिष्ट पोलिस निरीक्षक संपतराव भोसले साहेब, उद्योजक ज्योतिबा ऊबाळे,अभिनेत्री दर्पण ठाकूर,अभिनेत्री करिश्मा वाबळे, पोलिस निरीक्षक खंडागळे साहेब,अभिनेते संदीप पाटील,अभिनेते राज जंगम, आर .व्ही चेरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष राहुल व्यवहारे, शुभम वनपत्रे, प्रकाश यादव,अभिनेत्री नेहा वर्मा प्रमुख मान्यवर उपस्थित होते.