GM NEWS,प्रेरणादाई वृत्त: गेंदाबाई मोहनलाल लोढा, मोहन भुवन प्रतिष्ठानला २० हजारांची भरीव मदत ! सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच .सी .पाटील यांचे दातृत्त्व ! जामनेर तालुक्यात ५५ दिवसांपासून सुरू आहे गरजुंना राशन कीट वाटप .

0
304

जामनेर,दि.20 ( विनोद बुळे ) : – संकटात सोबत करणाराच खरा मित्र असतो याची प्रचिती जामनेर शहरातील गेंदाबाई मोहनलाल लोढा,मोहनभुवन प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष विनोद भाई लोढा आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या वतीने जामनेर तालुक्याला आली आहे . कोरोना लॉक डाऊन सुरू झाल्या पासुन गरजु कुटुंबांना मोफत राशन कीट वाटण्याचे काम गेंदाबाई मोहनलाल लोढा , मोहन भुवन प्रतिष्ठानच्या वतीने आज पर्यंत निरंतर सुरू आहे .

‘ येथील जनसेवेसाठी समर्पण करणाऱ्या गेंदाबाई लोढा प्रतिष्ठानचे सुरू असलेले सेवाभावी कार्य बघुन तोरनाळे येथील मुळ रहीवाशी सध्या जामनेर येथे स्थायीक असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच .सी. पाटील यांनी प्रतिष्ठानला वीस हजार रुपयांची भरीव मदत केली आहे .
सध्या संपूर्ण जगावर कोरोनारुपी वादळ घोंगावत असून संपूर्ण मानवजातीचे भावविश्व चिंतेने ग्रासले आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिर्घ लॉकडाऊन सुरू आहे . लॉकडाऊन दरम्यान हातावर पोट असणाऱ्या गोर- गरीब जनतेची, मजुर- कामगारांची उपासमार होऊ लागली . अशा संकटसमयी जामनेर येथील गेंदाबाई लोढा प्रतिष्ठान ,मोहनभुवन प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या ५५ दिवसांपासून अन्नधान्य किराणा साहित्याचे मोफत वाटप सुरू आहे . हा सेवाभाव पाहून प्रतिष्ठानचे सेवाभावी संचालक संदीप पाटील सर यांचे वडील सेवानिवृत मुख्याध्यापक एच .सी. पाटील यांच्यातील दातृत्व पुढे येऊन त्यांनी प्रतिष्ठानला २० हजार रुपयांचे योगदान दिले ,त्याबद्दल
गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहनभुवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोदकूमार लोढा , उपाध्यक्ष जितू भाऊ पालवे , सचिव मिलिंदआप्पा लोखंडे ,
विश्वस्त संतोष भाऊ सराफ , डॉ . संदीपजी पाटिल , डॉ .मनोजजी विसपूते ,दिपक भाऊ देशमुख , सुजित भाऊ सैतवाल ,लोकेशजी डांगी ,
रतनसिंह राणा यांनी त्यांचे आभार व्यक्त केले .
जामनेर तालुक्यात समाजसेवेसाठी गेंदाबाई मोहनलाल लोढा
मोहन भुवन प्रतिष्ठान सदैव तत्पर असून त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे .