एस.ए. सुरवाडे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार जाहिर .

222

जामनेर दि .१०( प्रतिनिधी ):- शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल जामनेर न्यू इंग्लिश स्कूल येथे सहशिक्षक म्हणुन कार्यरत असलेले एस.ए.सुरवाडे यांना मानाचा राज्यस्तरीय २०१९ सालचा ज्ञानज्योति पुरस्कार जाहीर झाला आहे.

कोल्हापूर येथील अविष्कार फौंडेशनच्या वतीने हा राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथे १८ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते श्री.एस. ए.सुरवाडे यांना देण्यात येणार आहे. पुण्यातील नेस वाडिया कॉलेज मध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार असून तसे संस्थेचे आमंत्रणपत्र श्री. सुरवाडे यांना प्राप्त झाले आहे..
एस. ए.सुरवाडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जामनेर तालुका एज्युकेशन संस्था तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक,सहकारी शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.