GM NEWS,ALERT: पहूर येथे कृषी निविष्ठा धारकांना बियाणे विक्रीसाठी वेळेचे बंधन. सकाळी ७ ते सायंकाळी ७ ची ठरली वेळ,मास्क वापरणे बंधनकारक ! नियम मोडल्यास कारवाई – एपीआय राकेशसिंह परदेशी

0
412

पहूर, ता जामनेर,दि .२२ ( शंकर भामेरे ) : – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पहूर येथील कृषी निविष्ठा धारकांना बियाणे विक्रीसाठी निर्धारित वेळ निश्चित करून या वेळेत बियाणे विक्री करणे बंधनकारक असणार असून सोशल डिस्टंसींगचे तंतोतंत पालन करण्याच्या सुचना साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी दिल्या .
पहूर येथील कृषी निविष्ठा धारक असोसिएशनची बैठक पोलीस ठाण्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेण्यात आली. यावेळी निविष्ठाधारकांनी सकाळी सात ते संध्याकाळी सात यावेळेत बियाणे विक्रीची मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ . अविनाश ढाकणे यांच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असून निविष्ठा धारकांनी केलेली मागणी मंजूर आहे.पण दुकानांवर गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन ,विक्रेते व शेतकरी यांनी तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधणे बंधण कारक आहे.नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कडक कारवाईचा ईशारा साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी दिला . यावेळी कृषी निविष्ठा धारक जिल्हा परिषद माजी कृषी सभापती प्रदिप लोढा, माजी उपसरपंच आर.बी पाटील, संतोष झवर अर्जून बारी, युवराज जाधव ,मनोज जोशी यांची उपस्थिती होती. शेतकरी बांधवानी दुकानांवर गर्दी करू नये नियमांचे पालन करून बियाणे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले .