फ्रेंडशिप बेल्ट बांधुन वृक्षांनाच केले मुलींनी मित्र,मालदाभाडी न्यु . इंग्लीश स्कुलचा स्तुत्य उपक्रम .

79

जामनेर दि .११ ( मिलींद लोखंडे ):- हल्ली मैत्री मैत्री दिन म्हणजे फ्रेंडशिप डे चे फॅड जोरात सुरू आहे या दिवशी मित्र-मैत्रिणींना फ्रेंडशिप बेल्ट बांधून तो साजरा करण्यात येतो मात्र येथून जवळच असलेल्या मालदाभाडी गावातील न्यू इंग्लिश स्कूल , मालदाभाडी या शाळेत फ्रेंडशिप डे निमित्त दुर्मिळ वृक्षांना फ्रेंडशिप बेल्ट बांधून हा दिवस साजरा करण्यात आला . वृक्ष हे आपले मित्र, सखा ,बंधू ,गुरु आहे , या संतांच्या वचनानुसार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वृक्षांना मैत्रीचा धागा बांधून त्यांना वाचवणे वृद्धिंगत करणे यासाठी अविरत प्रयत्न करणार असल्याचे बोलून दाखवले . ग्रीन आर्मी च्या माध्यमातून परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य होत असते. ग्रीन आर्मी चे प्रमुख विजय सैतवाल यांनी केलेल्या आवाहनानुसार काळसड, हिवर, खैर ,आपटा, बेहडा , यासारख्या नामशेष होऊ पाहणाऱ्या वृक्षांना वाचवण्याचे त्यांची संख्या वाढवणे यापुढे ग्रीन आर्मी करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुर्मिळ वृक्षांना फ्रेंडशिप बेल्ट बांधून त्यांना मित्र बनवणे. त्या वृक्षाबद्दल अधिक माहिती जाणून घेणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता या कार्यक्रमास विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक हे एस. आर. शिकोकार अध्यक्षस्थानी होते तर श्रीमती के.आर.महाजन ए. बी. पाटील प्रमुख अतिथी होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सैतवाल सूत्रसंचालन जी. टी .पाटील तर आभार आर. एल. कोळी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन. जी. पाटील ,एन. एस. पाटील एन. एस. चौधरी , एम.एस.जैन ,आर. ए. मोरे यांनी प्रयत्न केले