स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार .

291

जळगाव, दि .१३ ( मिलींद लोखंडे ) : – भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ गुरुवार, 15 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 9 वा 5 मि. नी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे वैद्यकीय शिक्षण,जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
या मुख्य शासकीय समारंभास शहरातील जास्तीत जास्त नागरीकांना भाग घेता यावा यासाठी 15 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 8.35 ते 9.35 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असेल तर त्यांनी तो त्यादिवशी सकाळी 8.30 च्या पूर्वी किवा 9.35 च्या नंतर करावा.
या मुख्य शासकीय समारंभास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, साहित्यीक, लेखक, कवी, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक, नागरीक, विद्यार्थी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००