महिला बचत गटांना मदत करण्यास नगर परिषद कटीबद्ध . – साधनाताई महाजन .

0
396

जामनेर- दि .१५( प्रतिनिधी ) : -जामनेर शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई महिला बचत गट, अहिल्याबाई महिला बचत गट व जय मल्हार महिला बचत गट या तिन्ही महिला बचत गटाची सन 2018 – 19 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा वाकी रोड जामनेर येथे, गटाचे संघटक/ सल्लागार/ सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री डी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्साहात  संपन्न झाली.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जामनेर नगरपंचायत पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यकक्षा, सौ साधनाताई महाजन व नगरसेविका सौ लीना सुहास पाटील या उपस्थित होत्या. तर बचत गटाच्या सर्व महिला सभासद देखील या वार्षिक सभेला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

या प्रसंगी नगराध्यक्षा  साधनाताई महाजन यांच्या हस्ते  सण 2018 ते 2019 या वर्षात वृक्षारोपण करणाऱ्या, जयश्री पाटील, शितल मानकर,मंगला जाधव, आशा जाधव, ज्योत्स्ना चोपडे, नर्मदाबाई कुमावत या महिला सभासदांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार देखील करण्यात आला.

यावर्षी देखील नगर पालिके मार्फत बचत गटांना वृक्षारोपण करण्यासाठी, रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांनी यावेळी बोलतांना सांगितले. या सोबतच त्यांनी सर्व महिला सभासदांच्या प्रश्नांना  समर्पक अशी उत्तरे सुध्दा दिलीत. तसेच माहिला बचत गटांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी उपस्थित माहिलांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 7 =