GM NEWS, प्रेरणादाई वृत्त: जामनेर तालुक्यातील पहूरच्या कोरोना योद्ध्या देताहेत राजधानी मुंबईत सेवा . पोलीस निरीक्षक अपर्णा जोशी यांचा गावकऱ्यांपूढे आदर्श . ‘घाबरू नका , पण काळजी घ्या ‘ चा संदेश !

0
1155

पहूर , ता . जामनेर , दि. ३० ( शंकर भामेरे ) : – संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाचा भारतात आणि महाराष्ट्रातही कहर वाढतोच आहे . राजधानी मुंबईत कोरोनाचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले असून पहूर पेठ ,ता . जामनेर येथील आर .टी. लेले हायस्कूलच्या सेवानिवृत्त आदर्श शिक्षीका सुहासीनी वसंतराव जोशी यांच्या कन्या अपर्णा वसंतराव जोशी या मुंबई पोलीस विभागात चेंबूर येथे गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदी कार्यरत असून कोरोनाच्या लढ्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभत आहे .
चेंबुर परिसरात वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनापुढे आव्हाण उभे केले आहे . ‘कॉन्टेनमेंट झोन ‘ मध्ये सध्या चेंबूरचा समावेश असुन आरोग्य विभाग, महसूल खाते तसेच पोलीस दलाने कोरोना नियंत्रणासाठी कंबर कसली आहे .
गोर- गरीब जनतेला स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न वाटप करण्यात येत असून पोलीस निरीक्षक अपर्णा जोशी समर्पित भावनेतून सेवा देत आहेत . खरं तर त्या पोलिस अधिकारी आहेत, मात्र अधिकारीपदाचा अधिकार न गाजवता माणुसकीच्या भावनेतून त्या कार्य करीत आहेत . त्यांच्या या सेवाकार्याने पहूरकरांसमोर आदर्श निर्माण झाला आहे . ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय ‘ हे ब्रीद शिरसावंद्य मानून त्या कर्तव्य बजवित आहेत .आमच्या GM NEWS च्या वतीने त्यांना मानाचा  सलाम !

‘घाबरू नका, पण काळजी घ्या ! ‘
कोरोनाला घाबरून चालणार नाही .. कोणत्याही गोष्टीची भिती बाळगली तर ह्रदयावर ताण येतो .परिणामी ह्रदयविकाराचा धोका संभवण्याची शक्यता वाढते . त्यामुळे न घाबरता आपन काळजी घेतली पाहीजे . संत्री, मोसंबी या लिंबु वर्गीय फळांचे तसेच आवळ्याचे सेवन करावे , त्यातून आपल्या शरीरास ‘सी ‘व्हिटॅमिन मिळते . सात्वीक आहार, योगा, प्राणायाम केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते . पुरेशी झोप घेणे, शरीराची स्वच्छता राखणे , नकारात्मक विचारांपासून दूर राहाणे आदी महत्वाच्या बाबी आहेत . सर्वात महत्त्वाचे म्हणजे विनाकारण घराबाहेर न पडणे, मास्क किंवा हातरुमालाचा वापर करणे , सॅनिटायझरचा उपयोग करणे, साबनाने हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंन्सींगचे पालन करणे या साध्या परंतू महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले, तर नक्कीच आपण कोरोनाशी सुरू असलेल्या युध्दात जिंकू शकू , असा मला आत्मविश्वास आहे . “

अपर्णा वसंतराव जोशी,
पोलीस निरीक्षक ,
गुन्हे शाखा, चेंबूर,
मुंबई विभाग