GM NEWS,दिलासादायक वृत्त: जामनेर तालुक्यातील पहूर कोवीड केअर सेंटर वरील १४ अहवाल निगेटिव्ह ! दोंदवाडे येथील ९तर पाळधी येथील ५जणांचा समावेश ! दोंदवाडे येथील १ अहवाल प्रतिक्षेत ! नोडल अधिकारी डॉ . हर्षल चांदा यांची माहिती !

0
717

पहूर, ता . जामनेर, दि .30 ( शंकर भामेरे ) येथील कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल केलेल्या १५पैकी १४जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती नोडल अधिकारी तथा वैद्यकिय अधिक्षक डॉ . हर्षल चांदा यांनी दिली .
प्राप्त अहवालांमध्ये ९ जण दोंदवाडे येथील असून ५ जण पाळधी येथील आहेत . या वृत्ताने पहूर परिसरातील जनतेला दिलासा मिळाला आहे .तथापी दोंदवाडे येथील १ अहवाल प्रतिक्षेत आहे . जनतेने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .