GM NEWS, इव्हेंट वृत्त : कोरोनाच्या कठीण काळात ‘ विवाह संस्कार ‘ झाला सोपा . जामनेर शहरात उपलब्ध होणार आता ‘सॅनिटाईज्ड ‘मंगल कार्यालय . शासकिय नियमांच्या पालनासह माफक दरात ५० वऱ्हाडींची सोय.नवरदेव – नवरी तुमच्याकडे बाकी सर्व आमच्याकडे ! न्यु महावीर टेन्ट हाऊसची कल्पकता .

0
913

जामनेर , दि .१ ( मिलींद लोखंडे )
‘गरज ही शोधाची जननी आहे ‘ ही म्हण खरी करून दाखविली आहे ,जामनेर येथील न्यु महावीर टेन्ट हाऊसचे संचालक प्रशांत प्रकाश सैतवाल यांनी .
सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने विवाहोत्सूकांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले होते .परंतु जामनेर येथील प्रशांत प्रकाश सैतवाल या कल्पक तरूणाने शासकिय नियमांच्या अधिन राहून विवाहोत्सुक मंडळींची गरज विचारात घेऊन सुसज्ज सॅनिटाईज्ड मंगल कार्यालय थाटले आहे . त्यांच्या या कल्पकतेचे सर्वत्र कौतूक होत असून त्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसादही लाभत आहे .

५१ हजारात ५० वऱ्हाडींची सोय –

न्यु महावीर टेन्ट हाऊसच्या या सुसज्ज सॅनिटाईज्ड मंगल कार्यालयात ५० वऱ्हाडी मंडळींसाठी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करता येईल अशा बैठक व्यवस्थेची सोय आहे . मास्क, सॅनिटाझर ,थर्मल स्किमींग या आरोग्य विषयक अत्यावश्यक सुविधांसह पारंपारिक अक्षदा, लग्न हार, मंगल सजावट , सुग्रास भोजन, पौराहित्याची ( ब्राम्हण ) सोय करण्यात आली आहे . या सर्व सुविधांसाठी मात्र यजमानांस ५१ हजार रुपये खर्च करण्याची तयारी मात्र ठेवावी लागणार आहे . ‘नवरदेव नवरी तुमच्याकडे बाकी सर्व आमच्याकडे ‘ असेच जणू संचालक प्रशांत प्रकाश सैतवाल यांच्या या अभिनव उपक्रमातून दिसते . त्यांच्या या कल्पकतेचे कौतूक होत आहे . या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन संचालकांनी ( मो . क्र .9922310022/9595109029 )केले आहे .