GM NEWS, क्राईम वृत्त: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस पाण्यात बुडवून जीवे मारले . शेंदुर्णी येथील खळबळजनक घटना .

0
2327

शेंदुर्णी,ता. जामनेर,दि.२ ( विलास पाटील ) : – येथील मगलांबाई प्रकाश मोरे,वय ३६,रा.वावडदा ता. जळगांव हल्ली मुक्काम फुकट पुरा शेंदूर्णी या महिलेला तिचा पती व आरोपी प्रकाश सुकलाल भिल राहणार वावडदा ता. जळगांव हल्ली मुक्काम फुकट पुरा शेंदूर्णी याने चारित्र्यावर संशय घेऊन येथील जंगीपुरा शिवारातील नथी आंबा झाडाच्या समोर सोननदी पात्रातील पाण्यात बुडवून मारले असल्याची तक्रारदार गजानन जनार्धन गायकवाड रा. फुकट पुरा शेंदूर्णी यांनी पहुर पोलीस स्टेशनमध्ये दिली असून तक्रारी नुसार काल दिनांक १/६/२०२० रोजी दुपारी ११ ते ५ वाजे दरम्यान घटना घडल्याचे नमूद करण्यात आले असून पहुर पोलीस स्टेशन भाग ५ गु.र.न.१४२/२०२० भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून तक्रारीत आरोपी हा मयताचा पती असून पत्नीच्या चारित्र्यावर घेत होता त्यामुळे त्याने मयत पत्नीला जीवे मारले आहे , आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे करीत आहे.