फत्तेपुर प्राथमिक आरोग्य केंद्रामधे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

0
392

जामनेर, दि .१६ (प्रतिनिधी)-प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपुर, येथे 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्वे नुसार, 2016-17 च्या सर्वेक्षणानुसार राज्यात कमी वयात तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थांच्या सेवनामध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे असंसर्ग रोग नियंत्रण कार्यक्रम व तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व भारत सरकारचा तंबाखु नियंत्रण कायदा 2003 प्रभावीपणे राबविण्यात यावा. समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार “तंबाखु विरोधी शपथ” घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती जामनेरचे, नवनिर्वाचित उपसभापती एकनाथ लोखंडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून फत्तेपुर येथील नवनिर्वाचित सरपंच बेबीबाई पाटील हे होते. त्याचप्रमाणे मुन्ना शेठ बंब, सुधाकर पाटील, संजय चौधरी, देवानंद लोखंडे, ज्योती चौधरी रमेश भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी उपस्थितांना तंबाखु विरोधी शपथ दिली.

पंचायत समिती उपसभापती म्हणुन निवड झाल्याबद्दल, एकनाथ लोखंडे व सरपंच म्हणुन निवड झाल्याबद्दल बेबाबाई पाटील यांचा अनुक्रमे डॉ. राजेश सोनवणे व
डॉ. पल्लवी सोनवणे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपुर यांच्या कडुन सत्कार देखील करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. विवेक जाधव, भागवत वानखेडे टी. आर.पाटील, आवळाबाई चौधरी ,अर्चना गवई , सुनील पाटील, युवराज वाघ, अनंता अवचार , अमोल वाघ, मनीषा शेळके, रेखा तायडे, सुनीता पाटील, प्रकाश महाले, कविता वाहुळे, लीना चौधरी, मनीषा वाकोडे, एम. डी. राठोड, ज्योती महोरिया, शांताराम खोतकर, पुजा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − seven =