गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंद करणे अनिवार्य.

0
241

जळगाव, दि. 19 ( मिलींद लोखंडे ) :- सार्वजनिकरित्या साजऱ्या होणाऱ्या उत्सव/कार्यक्रमांकरीता तसेच नजिकच्या काळात येणाऱ्या गणेशोत्सव व नवरात्रौत्सव या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील विविध सार्वजनिक उत्सव, उपक्रम व कार्यक्रम यांचेकरिता वर्गणी गोळा करणेकामी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41क अन्वये सहाय्यक/धर्मादाय उपायुक्त, जळगाव यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. असे धर्मादाय उप आयुक्त, जळगाव विभाग यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
यापूर्वी समक्ष येवून विहित नमुन्यातील फार्म व कागदपत्रे दाखल करणे आवश्यक होते. तथापि आता जनहितार्थ ही सुविधा धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे http://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन भरता येणार आहे.
यासाठी आवश्यक कागदपत्रे- सर्व सदस्यांचा सहीचा ठराव असावा, पदाधिकाऱ्यांचे/सदस्यांचे ओळखपत्राची स्कॅन प्रत सोबत जोडावी, जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत पत्र/परवानगीपत्र जोडावे, नगरसेवक/प्रतिष्ठीत व्यक्ती यांचे मंडळ सदस्यांचे ओळखीबाबत पत्र जोडावे, मागील वर्षीच्या उत्सवाचे हिशोब जोडणे आवश्यक, मागील वर्षी घेतलेल्या परवानगी पत्राची प्रमाणित प्रत जोडावी. अधिक माहितीसाठी धर्मदाय उप आयुक्त, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन धर्मदाय उप आयुक्त, जळगाव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × four =