मुंबई दि .२० ( प्रतिनिधी ) : -जळगाव महानगरपालिकेने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासंदर्भातील प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने 1989 ते 2001 या कालावधीत विविध विकास योजनांसाठी हुडको (Housing And Urban Development Corporation-HUDCO) या संस्थेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्यासंदर्भात हुडको यांचा 271 कोटी 73 लाखाचा किंवा त्यात समाविष्ट असलेले दंडनीय व्याज वगळल्यास उर्वरित 233 कोटी 91 लाखाच्या रकमेची एकाचवेळी परतफेड करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या अनुषंगाने आवश्यक रक्कम हुडकोला देण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महानगरपालिकेला निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यापैकी 50 टक्के रक्कम जळगाव महानगरपालिकेकडून दर महिना 3 कोटी रुपये याप्रमाणे वसूल करण्यात येणार आहे.