जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसाठी15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सुवर्णसंधी .

0
202

जळगाव, दि. 21 ( मिलींद लोखंडेे ) : – जवाहर नवोदय विद्यालय, भुसावळ येथे सन 2020 साठी होणाऱ्या ऑनलाईन प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर, 2019 आहे. जळगाव जिल्ह्यातील चालू शैक्षणिक वर्षी इयत्ता पाचवीत शिकत असलेले सर्व विद्यार्थी www.nvsadmissionclassix.in, www.navodaya.gov.in आणि www.jnvjalgaon.com या संकेत स्थळांवर आपला परिक्षा प्रवेश अर्ज भरू शकतात.
जवाहर नवोदय विद्यालय हे प्रत्येक जिल्ह्यात मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापित झालेले आहेत. या विद्यालयात सी.बी.एस.ई चे अभ्यासक्रम असून इयत्ता 12 वी पर्यंत उत्कृष्ट, आधुनिक व संपूर्ण सोयीयुक्त दर्जेदार शिक्षण प्राप्त करण्याची सुवर्ण संधी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व पात्र तसेच इच्छूक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. आर.आर.खंडारे, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, भुसावळ, जि.जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + nineteen =