GM NEWS,आंदोलन वृत्त : राज्यातील सुमारे 20 हजार विना-अनुदानित शिक्षक 9 जुन रोजी उतरणार रस्त्यावर. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन. सोशल डिस्टन्सींगचे होणार पालन . राज्याध्यक्षा शुभांगी पाटील यांची माहिती .

0
394

पहूर , ता . जामनेर दि .८ ( शंकर भामेरे )
राज्यातील विनाअनुदानित शाळांवरील शिक्षक ९ जून रोजी रोजी विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व त्यालुक्यात पायी चालत जाऊन जिल्हाधिकारी ,तहसीलदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर करणार आहेत.

या आहेत मागण्या –

राज्यातील राहिलेल्या अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्या निधीसह घोषित करणे.

दि .13 सप्टेंबर 2019 रोजी अनुदान घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांना निधी वितरणाचा जी आर काढून या शिक्षकांना प्रत्यक्ष अनुदान देणे .

20%अनुदान प्राप्त शिक्षकांना पुढील 40%अनुदानाचा टप्पा देणे.

विनाअनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देणे

या प्रमुख मागण्या घेवून शिक्षक राज्यभरात रस्त्यावर उतरणार आहेत.हे शिक्षक मागील 15 ते 20 वर्षा पासुन विनाअनुदानित शाळांमध्ये कोणत्याही मोबदल्याविना फुकटात ज्ञानदानाचे काम करीत असून आज ना उद्या आपल्याला पगार मिळेल या भाबड्या आशेवर जगत आहेत. परंतु शासनाला यांची दया येत नाही. पगारासाठी या शिक्षकांनी आता पर्यंत सुमारे 300 आंदोलने केली परंतु प्रत्येक वेळी केवळ अश्वासनावरच बोळवण करण्यात येते, पण प्रत्यक्षात पगार मात्र मिळत नाही.
असंख्य आंदोलन केल्या नंतर तत्कालीन भाजप सरकार व तत्कालीन शिक्षण मंत्री .विनोद तावडे यांनी दि 13 सप्टेंबर 2019 रोजी या पैकी काही शाळांना घोषित केले होते परंतु प्रत्यक्ष अनुदान मिळण्यासाठी अद्यापही ती फाईल वित्त मंत्रालयात प्रलंबित आहे.व एक वर्ष होऊन देखिल तिच्यावर कारवाई होऊन शिक्षकांना पगार मिळत नाही. दरम्यान आर्थिक विवंचनेतुन अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्या किंवा दबावाखाली हृदय विकाराने त्यांचा मृत्यू झाले व होत आहेत. परंतु सरकार ला त्याची जागा येत नाही. तश्यात दुष्काळात तेरावा महीना या म्हणी प्रमाणे देशात कोरोना चे संकट उभे राहिले व त्या मुळे या शिक्षकांची परिस्थिती अधिकच खराब झाली आहे. व त्यांना मदत करण्या ऐवजी सरकार आता कोरोना मुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे कारण पुढे करून शिक्षकांना त्यांचा हक्कचा पगार नाकारत आहे. या शिक्षकांना न्याय दयावा या साठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन तर्फे राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
दि 09जून रोजी सकाळी 11 ते 12 वाजे दरम्यान राज्यातील सर्व विना अनुदानित शिक्षकांनी आपापल्या जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर मा जिल्हाधिकारी यांच्या कडे ,तालुक्याच्या ठिकाणी असाल तर मा तहसीलदार यांच्या कडे सर्वांनी, लॉक डाऊन च्या नियमांचे पालन करत, तोंडाला मास्क लावून(शक्य असल्यास काळे मास्क) लावून हातात आपल्या मागण्याचे फलक घेऊन सोशल डिस्टन्स चे पालन करत पायी चालत जाऊन, निवेदन देण्याचे आवाहन राज्याध्यक्षा शुभांगी पाटील यांनी केले आहे.