GM NEWS अभिनंदनीय वृत्त : परीट धोबी समाजाच्या रावेर महिला तालुकाध्यक्ष सविता ताई सूर्यवंशी यांची यशस्वी वाटचाल . गेल्या दोन वर्षांपासून सांभाळत आहेत धुरा . कौतुकास्पद कामगिरीने उभा केला समाजासमोर आदर्श .

0
301

जामनेर दि .८ ( मिलींद लोखंडे ) : – महाराष्ट्र राज्य
परीट धोबी समाजाच्या रावेर महिला तालुकाध्यक्षा सविताताई सूर्यवंशी या समाज बांधणीच्या कामात मोलाचे योगदान देत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
परीट धोबी समाजातील गरीब समाज बांधवांना तसेच लॉन्ड्री धारक बांधवांना संघटित करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य करण्याचे कार्य सविताताई निरपेक्ष भावनेने करीत आहेत .गेल्या दोन वर्षांपासून त्या तालुकाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळत आहेत .परीट धोबी समाजाचे संस्थापक अध्यक्ष डी .डी .सोनटक्के साहेब तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष रमेशदादा लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली सविताताई सूर्यवंशी यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे .त्यांच्या या यशस्वी समाजकार्याचे राकेश वाघ, मनिषा सपकाळे,जामनेर तालुकाध्यक्षा रंजना वाघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुणाताई रायपुरे ,सुदाम मंडाळे,एकनाथ महाले ,गणेश खरचे ,पंढरी कोकाटे ,सोपान रायपुरे आदींनी कौतुक केले आहे .