GM NEWS शैक्षणिक वृत्त : नव्या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाची पूर्वतयारी सुरू . जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी अकलाडे करताहेत जिल्ह्यातील शाळांची माहिती जमा . शाळेची घंटा वाजणार कधी ? उत्कंठा मात्र कायम .

0
450

पहूर , ता . जामनेर दि .८ ( शंकर भामेरे ) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळेची घंटा कधी वाजणार ? याविषयी विद्यार्थी, शिक्षक, पालक या साऱ्यांनाच मोठी उत्कंठा लागली असून त्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण विभागाने पूर्व तयारी सुरू केली आहे .जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा . शि . अकलाडे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना पत्र पाठवून ते प्रत्येक शाळेविषयी वस्तुनिष्ठ माहिती संकलित करीत आहेत .
14 जून अखेर दीर्घ सुट्या संपत असल्या तरी 15 जून पासून प्रत्यक्ष शाळा सुरू होणार काय ?याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही .तथापि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासून येत्या 15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला पाहिजे याविषयी शिक्षण विभाग तयारी करीत आहे .प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यास शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय उपाय योजना कराव्यात ? याविषयी मार्गदर्शक तत्वे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले आहेत .
जळगाव जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होताना दिसत आहे .या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून सुरू होतील याबाबत शंकाच आहे .असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन पद्धतीने शाळा नव्हे तर शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शासन विचाराधिन आहे .
जर प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या तर शाळेत कोणत्या सुविधा असाव्यात याविषयी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला पाठवलेल्या पत्रात मार्गदर्शक खालील प्रमाणे सूचना केल्या आहेत .

शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ ,स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने शाळेचे निर्जंतुकीकरण करावे.

वर्गखोल्या ,मैदान, स्वच्छतागृह, कार्यालय यांची स्वच्छता करावी.

पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करावे.

शिक्षक,विद्यार्थ्यांसाठी हात धुण्यासाठी हँडवॉश ,साबण सॅनीटायझर ,थर्मलस्क्रीनींगची व्यवस्था करावी .

शाळेतील एलईडी, टीव्ही ,संगणक यांची दुरुस्ती करावी.
शक्य असल्यास माइक व्यवस्थेचा उपयोग करावा.

प्रवेशासाठी गुगल लिंगचा उपयोग करावा.
पावसाळी स्थिती लक्षात घेऊन पाठयपुस्तके व्यवस्थित ठेवावेत आणि प्राप्त सूचनेनुसार त्यांचे वितरण करावे .
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी ट्रिपल लेयर मास्कचा उपयोग करावा .

सर्वांचे तापमान नियमित थर्मल स्कॅंनर तपासावे .