GM NEWS,FLASH: जळगांव जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राजेंद्र राऊत यांचा अल्पपरिचय .

0
2287

अभिजीत राजेंद्र राऊत यांनी आज दि. १८ जुन २०२० रोजी जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला असून त्यांचा अल्पपरिचय खालील प्रमाणे ..

अभिजीत राजेंद्र राऊत हे 2013 मध्ये संघ लोकसेवा आयोग परीक्षेतून उत्तीर्ण झाले आहेत . आय.आय.टी रुकरी येथून त्यांनी जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी )या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे .सन 2014- 15 यावर्षी ते सांगली येथे प्रशिक्षण कालावधीत असिस्टंट जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते .2015 मध्ये ते भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयात शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागात असिस्टंट सेक्रेटरी म्हणून त्यांनी यशस्वीरित्या कार्यभार सांभाळला असून 2015 ते 2017 या कालावधीत ते नंदुरबार जिल्ह्यात तळोदा येथे असिस्टंट जिल्हाधिकारी आणि आय. टी .डी . पी . चे प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत होते .सन 2017 पासून सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते .

मिळालेले पुरस्कार –
सन 2017 मध्ये सांगली दर्पण या पुरस्काराने राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले .

राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन 2017 -18 मध्ये यशवंत पंचायत राज पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आले .

मसूरी येथे ग्राम विकास अभ्यासासाठी त्यांना 88 व्या फाउंडेशन कोर्स अंतर्गत कांस्यपदक प्रदान आले .

सहभाग –
मसूरी येथे जुलै 2016 मध्ये झालेल्या इफेक्टिव्ह एसडीएम कार्यशाळेत त्यांनी मेंटर म्हणून यशस्वीरित्या सहभाग नोंदविला आहे .

डिसेंबर 2017 मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राष्ट्रीय परिषदेत त्यांचा सक्रिय सहभाग होता .

ऑगस्ट 2018 मध्ये उदयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत त्यांनी ‘ODF sustainability’या विषयावर प्रभावी सादरीकरण केले .
संकलन – मिलींद लोखंडे, संपादक – GM NEWS.