GM NEWS गुन्हे वार्ता : शेंदुर्णी येथे चार जुगाऱ्यांना अटक . पहूर पोलिसांची कारवाई . अवैध धंद्यांविरूद्ध उघडली मोहीम .

0
102

शेंदूर्णी , दि .२१ ( विलास पाटील ) येथे पत्ता खेळणाऱ्या ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती पोलीसांनी दिली .
शेंदूर्णी येथे आज दुपारी एक वाजता चंदर जगन सकट यांच्या घरामागील शेरीमध्ये आरोपी रमेश एकनाथ कोळी (वय ५२ ) प्रकाश अमृत सकट (वय २७ ) प्रभाकर पंडित धनगर (वय ३५ ) चंदर जगन सकट ( वय ४३ ) सर्व रा . शेंदूर्णी यांना पत्ता खेळतांना रंगेहात पकडले . आरोपींतांच्या विरुद्ध मुंबई जुगार अधिनियम १२(अ)प्रमाणे पो.कॉ. गजानन ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे . आरोपी गैरकायदा स्वतः च्या फायद्यासाठी ५२ पत्त्याच्या कॅटवर पैसे लावून हार जीतचा मांग पत्ता नावाचा झन्ना मन्ना पत्ता जुगार खेळतांना व खेळवितांना रोख रुपये १६७५ /- व ५२ पत्त्याचा कॅटसह मिळून आले पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किरण बर्गे ,पोहेका किरण शिंपी, प्रशांत विरणारे, गजानन ढाकणे यांनी अवैध धंद्या विरोधात मोहीम चालविली आहे .