GM NEWS,वास्तव वृत्त: कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकाकडून नाकारले जातेय नवीन कर्ज .

0
736

तळेगाव,ता.जामनेर,दि.२१ ( डॉ. गजानन जाधव ) : – शासनाने कर्जमाफी तर केली मात्र ही कर्जमाफी देखील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असून नवीन कर्ज मिळण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून बँका चक्क बोजा कमी करण्याचे पत्र देऊन तुम्ही कुठल्याही बँकेत जा आम्ही आपल्याला कर्ज देऊ शकत नाही अशा प्रकारची माहिती देत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून समरोद ता जामनेर येथील शेतकरी प्रफुल वसंत डांगे हे शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा जामनेर मध्ये २००९ पासून नियमित कर्ज भरणारे खातेदार होते मात्र मागील वर्षी फक्त अतिवृष्टीमुळे थकबाकीदार झाले आणि योगायोगाने या वर्षीच्या कर्जमाफीत बसले मात्र हीच कर्जमाफी त्यांना डोकेदुखी ठरत असून इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे कर्जमाफी चा लाभ घेतल्यामुळे त्यांनी बँकेत नवीन कर्जाची मागणी केली असता बँकेने त्यांना चक्क त्यांच्या हातात बोजा कमी करण्याचे पत्र दिले तुम्ही आमच्या बँकेचा बोजा कमी करून इतर कुठल्याही बँकेत जा व कर्ज घ्या आम्ही आपल्याला कर्ज देणार नाही असे सांगितल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले मात्र आता शेतकर्‍यांपुढे प्रश्न पडला असून जायचे कुठल्या बँकेकडे गेले तरी तिथं पुन्हा हा नवीन कारण करणे कागदपत्र करणे आणि एवढे करूनही ती बँक देईल याची हमी नाही शासन मात्र या बाबतीत कुठलीही कठोर पाऊल उचलत नसून बँकांना कुठलीही सूचना देत नाही बँकांची मनमानी अशीच चालू राहिली तर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनी जावे कुणाकडे दाद मागावी कुठे असा प्रश्न निर्माण झाला असून ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली त्यांना बँकांनी किती कर्ज वाटप केलं का नाही केला असता का केला नाही अशी विचारणा शासनाने केली पाहिजे तसेच शेतकरी देखील आता त्याच्या विरोधात तक्रारी करीत असून प्रफुल्ल दादा वसंत डांगे हे अल्पभूधारक शेतकरी असून ते याबाबत मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना मेल द्वारे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे तसेच युनियन बँकेत कर्जदार असलेले अशोक रामदास माळी तळेगाव ता.जामनेर यांनादेखील या परिस्थितीला सामोरे जावे लागत असून बँक नवीन कर्ज देण्यास तयार नाही तुम्ही जर कर्जमाफीत बसला आहात तर तुम्हाला कर्ज देता येणार नाही किंवा नवीन तारण करून द्यावे लागेल असे सांगितले जात आहे जेव्हा कर्जमाफीची यादी आली तेव्हा सदर शेतकरी बँकेत गेले असता त्यांनी सांगितले की तुम्ही फक्त ५० हजाराचा लाभ द्या आम्ही तुम्हाला नियमित कर्जफेड करणाऱ्यांमध्ये दाखवू व तुम्हाला त्यासाठी 25 ते 30 हजार रुपये भरावे लागतील मात्र शासनाने यांना पूर्ण जर कर्जमाफी केली आहे तर हे पैसे कशासाठी भरतील म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक बँकांकडून होत असताना शासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आता दिसत आहे.