तळेगाव,ता.जामनेर,दि.२९ ( डॉ. गजानन जाधव) : – भारूडखेडा पाझर तलावाचे कामाला सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी न भांडता जमिनी दिल्या. मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. कोरोनामुळे शेतीचा मालाची विक्री झालेली नाही. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तत्काळ मोबादला मिळावी, अशी मागणी होत आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत भारुडखेडा पाझर तलाव मंजूर झाले असून भारुडखेडा पाझर तलाव व चिंचखेडा तलावाच्या कामाचे विधानसभा निवडणुकाच्या अगोदर मोठ्या धुमधडाक्यात जलसंपदामंत्री गिरीष महाजन याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पाझर तलावाच्या कामाला एक वर्षे पूर्ण झाले असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना हलाखीचे दिवस आले आहेत. शेती शिवाय दुसरे उत्पन्न नसल्याने व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळात नसल्याने मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाझर तलावाच्या संपादीत जमीन पावसाळ्या शेतकरी शेती करून आपला उदरनिर्वाह करत असतात. मागील वर्षी त्याच्या शेतात पाझर तलावाचे काम सुरु झाल्याने पिके घेता आली नाही. त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरविला गेला. सुमारे पंधरा शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत केल्या आहेत. मोबदला मिळाला नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. बळीराजा हैराण झाला आहे. याची वरिष्ठ पातळीवर दखल घ्यायला हवी.
अधिकारीही फिरकेना
पाझर तलावाचे काम सुरू झाल्यापासून भारुडखेडा गावातील शेतकऱ्यांना कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही. संपादीत जमिनीच्या मोजणी होत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. यावर्षी कोरोनामुळे शेती मालाला उठाव नाही. संपादित जमिनीचा मोबदला लवकरात लवकर मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
Home जामनेर विशेष GM NEWS,वास्तव वृत्त: जामनेर तालुक्यातील भारुडखेडा व चिंचखेडा पाझर तलावाच्या संपादीत जमिनींच्या...