*GM NEWS ALERT: जामनेर तालुक्यातील १५ जणांना कोरोनाचा संसर्ग .* *जामनेर शहरातील ९ जणांसह टाळकी येथील १ तसेच पहूर पेठ येथे एकाच कुटुंबातील ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह . २ वर्षाच्या चिमुकलीचा समावेश .* *नागरिकांनी काळजी घेण्याची प्रशासनाचे आवाहन . शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कधी कारवाई होणार ? संतप्त नागरिकांचा सवाल .*

0
2756

पहूर ,ता .जामनेर ( शंकर भामेरे ) : – जामनेर तालुक्यातील १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जामनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ . राजेश सोनवणे, नोडल अधिकारी डॉ . विनय सोनवणे, आणि पहूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . हर्षल चांदा यांनी दिली आहे .

जामनेर तालुक्यात आढळलेले रुग्ण खालील प्रमाणे .

आज दि.22 जुन जामनेर तालुक्यात आढळले एकूण 15 कोरोना बाधीत –
शहरी 9
ग्रामीण 6
जामनेर:
श्रीरामपेठ 1
शास्त्री नगर 1
माळी गल्ली 1
पाचोरा रोड 4
इंदिरा आवास2
ग्रामीण:
टाकळी खु. 1
पहुर 5

जामनेर तालुक्यात एकूण 128 रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह आढळून आले.
पैकी जामनेर(शहरी)= 90
ग्रामीण =38
बरे झालेले =66
शहरी=60
ग्रामीण=6
उपचारा खाली= 51
शहरी=25
ग्रामीण=26