GM NEWS : गुन्हे वार्ता : पहूर येथील हाणीमारी प्रकरणी अखेर ९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल . ५ जण अटकेत ;४ फरार अवैध धंद्यांवरून झाली होती हाणामारी . सदर अवैध धंदे कायमस्वरूपी बंद ठेवण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी .

0
532

पहूर ता. जामनेर दि .२२ ( शंकर भामेरे ) पहूर येथील लेलेनगर भागात पहूर शेंदूर्णी रोडवर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गेल्या काही वर्षापासून अवैध व्यवसाय दारू ,सट्टा पत्ता राजरोसपणे सुरू आसल्याने अवैध धंद्यावरून दोन गटात लाठ्याकाठ्या , लोखंडी पाईप , सोडा वाटरच्या बाटल्याने तूफान हाणामारी झाल्याने पाच जण जखमी झाले. स्थानीकांच्या म्हणण्यानूसार भरवस्तीत दारू ,सट्टा पत्ता असे व्यवसाय पोलिसांना न घाबरता बिनदिक्कत सुरू होते. रविवारी रात्री ८च्या वाजेच्या दरम्यान दोन गट समोरासमोर येऊन दगडफेक करीत ,लोखंडी राॕड , सोडा वाटरच्या बाटल्याने मारहाण एकमेकांवर तूटून पडले.सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेशसिँग परदेशी हे ताबडतोब आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी गर्दीवर नियंत्रणा मिळविले.पाच जणांना ताब्यात घेतले मात्र या हाणामारीत पाच जण जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले होते. परंतु सकाळी परत दोन्ही गट आमने सामने येऊन भांडणाला सुरूवात झाली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी भांडणा बाबत विचारणा केली आसता आमचे सामाईक भिंतीवरून वाद असल्याचे कारण त्यांनी सांगितले .सदर आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून एकमेकांना लोखंडी राॕड , लाठ्याकाठ्यांनी मारहाण करणे ,दमदाटी व शिवीगाळ केल्याचे पोलिसांना मिळून आल्याने पो काॕ नवल दगडू हटकर यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने नीतीन शिवाजी पांढरे वय ३३ , सचीन शिवाजी पांढरे वय २७ , महेश शिवाजी पांढरे वय२५, संदीप वसंत मराठे सर्व रा. लेलेनगर यांचेसह समोरील शाम प्रभाकर कुमावात वय ४१, दिपक प्रभाकर कुमावत वय ३०, सतीष प्रभाकर कुमावत वय २८ ,प्रभाकर पांडूरंग कुमावत वय ५१ ,संदीप कुमावत रा.सर्व लेलेनगर यांचेवर भादवि कलम१६०,१४३,१४७,१४८,१४९,३२४,५०४,५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.तर चार जण अद्याप फरार आहेत .पुढील तपास पोलीस उप निरिक्षक चेडे हे करीत आहेत.