GM NEWS :अभिनंदनीय वृत्त : शेंदूर्णी पोलिसांनी मिटवला दोन भावांमधील शेताच्या बांधाचा जुना वाद . लिहा तांडा येथील शेताच्या बांधावर गेले पोलीस . सामोपचाराने वाद मिटल्याने ग्रामस्थांनी केले पोलिस दादांचे कौतुक .

0
358

शेंदूर्णी ,ता . जामनेर दि .२२ ( विलास पाटील )
गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून शेताच्या बांधावरून दोन चुलत भावांमध्ये असलेला वाद पोलिसांनी सामोपचाराने मिटल्याची सुखद घटना जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे घडली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेंदुर्णी येथून जवळच असलेल्या लिहा तांडा येथील शेत शिवारात हरीलाल राठोड यांच्या मालकीचे गट नं ६८/अ/२ असून याच शिवारात त्यांच्या शेत बांधालगत त्यांचे चुलतभाऊ धर्मा गुरुदास राठोड यांचे शेत गट नं ७६ असून दोघांचा सामाईक बांधाचा गेल्या १० /१५ वर्षांपूर्वीचा प्रलंबित वाद होता त्यामुळे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणाने शेतात दोन्ही वादींचे वाद व्हायचे व प्रकरण पहुर पोलिस स्टेशनच्या शेंदूर्णी दुरक्षेत्रावर यायचे . यावर्षीही वाद चालू होता .परंतु यावेळी शेंदूर्णी पोलिसांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन गावातील माध्यस्थ उत्तम मांगो चव्हाण, लखन झामसिंग नाईक ,सरीचंद लाला राठोड, जोतमल जयराम चव्हाण,गोकुळ मदन राठोड यांच्या माध्यमातून शेतात प्रत्यक्ष पाहणी करून शेत बांधाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत दोरी टाकून सर्वांच्या सहमतीने बांध आखणी केली व दगडाच्या ठिकठिकाणी खुणा रोवून दोन चुलत भावांच्या मधील १०/१५ वर्षांपूर्वीचा बांधाचा वाद सामोपचाराने कायमस्वरूपी मिटवला त्याबद्दल पो.ना.८७० किरण शिंपी,पो.ना.२०९६ प्रशांत विरणारे यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.