GM NEWS : कृषी वार्ता : पहूर शिवारात दमदार पावसाची प्रतीक्षा . इवलुशी पिकं उन्हामुळे लागली करपू . सिंचनाची सोय नसलेल्या शेतकरी बांधवांना चिंता .

0
183

पहूर ता .जामनेर , दि . २५ ( शंकर भामेरे ) पहूर शिवारातील पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या असून पिकं ताशी लागली आहेस .मात्र आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसामुळे सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतातील इवलुशी पीकं उन्हाच्या तडाख्यात कोमेजून जात आहेत . पिकांना संजीवनी मिळण्यासाठी शिवारात दमदार पावसाची शेतकरी बांधवांना प्रतिक्षा आहे .

पहूर परिससरात सांगवी , खर्चाणे, शेरी , लोंढरी , हिवरी हिवरखेडा आदी भागांत कपाशी ,मका या प्रमुख पिकांची लागवड खरीप हंगामात केली जाते . त्या खालोखाल ज्वारी , उडीद , मुग , तूर , यासह भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सून वेळेवर आणि सरासरी इतका होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे . त्यानुसार शेतकरी बांधवांनी पेरण्यांची कामं भराभर उरकली . आता मात्र पावसाने दडी मारल्याने ताशी लागलेली पिकं उन धरू लागली असल्याने शेतकरी बांधव दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.