GM NEWS : अभिनंदनीय वृत्त : आरोग्यदूत प्रफुल्ल लोढा यांच्या मुलीचा आदर्श विवाह सोहळा संपन्न . राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले वधू -वरांना शुभाशीर्वाद . सोशल डिस्टंसिंगचे केले पालन .

0
2140

जामनेर , दि २७ ( मिलींद लोखंडे ) : – जामनेर तालुक्यातील पहुर पेठचे रहिवासी सामाजिक कार्येकर्ते ,आरोग्यदुत तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल लोढा यांच्या भावाची कन्या चि .सौ. का .तिथी अजय लोढा यांचा पूणे येथील चि .सुयश लुनावत यांच्याशी काल दिनांक 26 जुन रोजी साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला .
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे पालन करून सदर विवाह समारंभ पुणे येथे पार पडला. मुलीचे काका प्रफुल्ल लोढा यांनी कन्यादान केले. या शुभ विवाह प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वधू वरांना शुभाशीर्वाद देऊन पुढील सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. साध्या पद्धतीने विवाह सोहळा आयोजित केल्याबद्दल वधु- वर पित्याचे कौतुक होत आहे .