GM NEWS,कृषी वृत्त: शेतकऱ्यांनी युरिया खताचा कमीत कमी वापर करून रासायनिक खताचा साठा न करता मिश्र खतांचा वापर करावा. – मंडळ कृषी अधिकारी कु.डी.व्ही.चासकर .

0
597

तळेगाव ता.जामनेर ता.२७,(डॉ.गजानन जाधव):-

तळेगाव परिसरात रब्बीच्या ९० टक्के पेरण्या पूर्ण झाले असून परिसरात सत्तर ते ऐंशी टक्के कापूस लागवड झाली आहे याबाबत तळेगाव ग्रामपंचायत कार्यालयात कापूस पिका बाबत मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी कुमारी डी व्ही चासकर यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी युरिया खताचा कमीत कमी वापर करावा व खताचे साठा न करता मिश्र खताचा देखील वापर करावा असे आवाहन केले तसेच गेल्या दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट होऊ शकते यासाठी आपण व्यवस्थापन करून ठेवावे तसेच अशी परिस्थिती येऊ नये मात्र आल्यास दुसरे बियाणी उपलब्ध आहे असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच वेळीच बागायती व कोरडवाहू शेती तण व्यवस्थापन करून शेतीला तणमुक्त ठेवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी कृषी सहाय्यक जी एन तायडे यावेळी उपस्थित होते तसेच तळेगाव येथील शेतकरी राजू माळी कांतीलाल चौधरी महावीर चोरडिया गावकरी तसेच शेतकरी मंडळी उपस्थित होते यावेळी प्रत्यक्ष शेतात जाऊन देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.