GM NEWS FLASH: दिलासादायक वृत्त : लग्नाचं वऱ्हाड निघालय ….. ? पण वधु वरासह फक्त ५० वऱ्हाडींना मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी जळगांव जिल्हाधिकाऱ्यांची सशर्त परवानगी . विवाहोत्सुकांना काहीसा दिलासा .

0
578

जळगांव , दि. २७ ( मिलींद लोखंडे ) : –
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लग्न समारंभासाठी मंगलकार्यालया मध्ये पन्नास वऱ्हाडी मंडळींच्या आत सशर्त परवानगी दिली आहे ,यामुळे विवाहोत्सुकांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही वाढतच आहे .कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी विविध उपक्रम हाती घेतले आहेत .
याचाच एक भाग म्हणून पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर खुले लॉन , सभागृह ,विना वातानुकुलीत मंगल कार्यालयात ५० व्यक्तींच्या आतील संख्येची मागणी केल्यास मंगल कार्यालयांत विवाह सोहळा पार पाडता येईल असे आदेश जळगांव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत .मात्र यासोबतच काही अटींचे पालन करणे वधू-वर पित्यांना तसेच वऱ्हाडी मंडळींनाही बंधनकारक करण्यात आले आहेत .
अटी –
प्रत्येक व्यक्तीला मास्क बांधणे बंधनकारक राहील .

सॅनिटायझरचा वापर करावा लागेल .

सोशल डिस्टंसिंगचे सर्वांनी पालन करणे बंधनकारक आहे .

फक्त 50 जणच येणार आहेत त्याचे हमीपत्र आयोजकांनी दिले पाहिजे .

प्रतिबंधित क्षेत्रातील वऱ्हाडी मंडळी आलेली आहेत काय याची नोंद ठेवावी लागेल .

शासनाने वेळोवेळी केलेले कोविड नियंत्रणासाठीचे नियम व अटी पालन करणे गरजेचे राहील .