भटक्या जमातींनी मेंढी व शेळी पालन प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन .

0
859

जळगाव, दि. २८ ( राजेश शितोळे ) :- महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे अंतर्गत राज्यात मेंढी व शेळी पालनास प्रेात्साहन देण्यासाठी राजे यंशवतराव होळकर महामेष योजनेंतर्गत राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील अर्जदारांकडून ४ सप्टेंबर, २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेची संपुर्ण माहिती व अर्ज करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपुर्ण तपशील www.mahamesh.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या वरील संकेतस्थळावर तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन Mahamesh App द्वारे करण्यात यावे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी.

तरी इच्छुक अर्जदारांनी या योजने अंतर्गत विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − nine =