GM NEWS ALERT: पहूर कसबे येथील बाधित तरुणाच्या कुटुंबातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह . ४ वर्षीय चिमुकलीचा समावेश . पहूर क्वारंटाईन सेंटरवरील ३४ अहवाल निगेटीव्ह .

0
435

पहुर , ता जामनेर दि .२८( शंकर भामेरे )जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे बाधित तरुणाच्या कुटुंबातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात चार वर्षीय बालिकेचा समावेश असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ .चांदा यांनी दिली .
पहूर कसबे येथील मज्जित गल्लीत राहणाऱ्या टेलर व्यावसायिकाचा अहवाल पॉझिटिव आला होता त्याच्या संपर्कातील १४जणांचे स्वॅब घेण्यात आले होते . त्यातील ६५ वर्षीय वृद्धासह ३० वर्षीय तरुणाचा आणि ४ वर्षीय चिमुकलीचा अहवाल पॉझिटिव आला आहे .
यापूर्वीच मज्जित गल्लीचा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे .पहुर -कसबे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे .

दरम्यान ,पहूर क्वारंटाईन सेंटर वरील ३४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत .

पहूर परिसरातील आजचे बाधित खालील प्रमाणे

पहूर – कसबे -३
सोनाळा -२
पाळधी -१
चिंचखेडा -१
शेंदुर्णी -१
लोंढरी -१