GM NEWS,FLASH: जळगांव जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नगर जिल्ह्यात होणारे स्थलांतर जळगाव जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी थांबवुन दाखवावे.* *- आ.एकनाथ खडसे यांचे जळगांव जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांना आव्हान !*

0
800

तळेगाव ता.जामनेर, दि .२८ (डॉ.गजानन जाधव)  : –

वरणगाव येथे मंजूर असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नगर जिल्ह्यात होणारे स्थलांतर थांबवून दाखवावे, असे आव्हान भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांना दिले आहे.
नाथाभाऊंचा प्रशासनाला धाक आणि सरकारवर वचक होता म्हणून जिल्ह्यात अनेक कामे आणलीत. आता जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये दम असेल तर त्यांनी वरणगाव येथे मंजूर असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नगर जिल्ह्यात होणारे स्थलांतर थांबवून दाखवावे, असे आव्हान भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले आहे. याचबरोबर सत्ताधारी पक्षांनी निदान जिल्ह्यात आम्ही आणलेली कामे तरी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यात हलविण्याबाबत राज्य शासनाच्या निर्णयावर केले आहे.
याबाबत खडसे यांनी सांगितले, १९९९ साली वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरी लगत पोलीस प्रशिक्षण केंद्र मी मंजूर करवून घेतले होते. यासाठी १०६ एकर जमीन शासनाकडून मंजूर करवून घेतली होती, तर नियोजित पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजनही पार पडले होते. आर्र्थिक तरतूदही केली होती. मधल्या काळात हे प्रशिक्षण केंद्र हलविण्याच्या हालचाली असताना मी आक्रमक भूमिका घेत हा प्रकल्प येथून हलवू नका, अशी मागणी केली होती. परिणामी पुन्हा या प्रकल्पाबाबत आशावाद निर्माण झाला होता.
अनेक प्रकल्प हलविण्याचा घाट
आता अलीकडे आपण राजकीय दृष्ट्या प्रशासन आणि शासन यापासून लांब असल्याने सरकारला फावले आहे. केवळ वरणगाव पोलीस प्रशिक्षणच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हलविण्याचे घाट सुरू आहेत, असा आरोपही खडसे यांनी केला.
सत्ताधारी पक्षातील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमध्ये दम असेल तर त्यांनी आता ताकद लावावी आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र हलविण्यात येण्याची कार्यवाही थांबवून दाखवावी व हे प्रशिक्षण केंद्र आकारास आणून दाखवावे, असे आव्हान त्यानी दिले आहे. निदान आम्ही जिल्ह्यात आणलेले प्रकल्प इतरत्र वळू नये याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाने घेतली पाहिजे. जेणेकरून जिल्ह्याचे नुकसान होणार नाही, असेही खडसे म्हणाले.