GM NEWS,प्रेरणादाई वृत्त: शेंदूर्णी येथील जनता कर्फ्युला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद. बंदचे काटेकोरपणे पालन ,बाजारपेठेत शुकशुकाट.

0
426

शेंदुर्णी,ता.जामनेर,दि. २८(विलास पाटील) : – शेंदूर्णी येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पहुर पोलिस स्टेशनकडून शेंदूर्णी दुरक्षेत्रावर शांतता कमिटी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी शेंदूर्णी मध्ये कोरोना संसर्ग झालेले पाच रुग्ण गावात आढळून आल्याने चिंता व्यक्त करतांनाच दि. २८ जुन ते १ जुलै पर्यंत जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले होते त्याची सुरुवात आज दिनांक २८/६/२०२० पासून झाली असून आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला तर काही दुकाने सुरू तर नाहीत ना याची खात्री करण्यासाठी व दुकानदारांना आवाहन करण्यासाठी भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल,पंडित दीनदयाळ पतसंस्था चेअरमन अमृत खलसे राष्ट्रवादी शहराध्यक्ष रविंद्र गुजर, नगरसेवक निलेश थोरात, पत्रकार विलास अहिरे हे स्वतः गावातून फेरफटका मारून आले नागरिकांचा १००% प्रतिसाद जनता कर्फ्युला दिसून आला आहे नागरिकांनी फिजीकल डिस्टन्स पाळावे कामाशिवाय घराबाहेर पडू नये,मास्कचा वापर करावा,पाच पेक्षा जास्त नागरिकांनी घोळक्याने फिरू नये असे आवाहन मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पोलिस प्रशासनाचे वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी,उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे यांनी केले आहे तसेच दिनांक १/७/२०२० रोजी आषाढी एकादशी असली तरी राज्यातील सर्वच मंदिरे बंद असल्याने शेंदूर्णी येथीलही सर्व मंदिरे बंद आहेत म्हणून कोणीही दर्शनासाठी येऊ नये असेही आवाहन वरील अधिकारी यांचे कडून करण्यात आले आहे