*GM NEWS,दिलासादायक वृत्त : दिव्यांगांना मिळणार सर्व सुविधायुक्‍त युनिक कार्ड* *दिव्यांगांना एस.टी, रेल्वे, विमान, व इतर सर्व शासकीय योजनांचा फायदा*

0
796

तळेगाव,ता.जामनेर,दि.२८ (डॉ.गजानन जाधव) : –

-दिव्यांगांना केंद्र शासनाच्या वतीने दिव्यांगांना ‘एक कार्ड-अनेक सुविधा’ याअंतर्गत अनेक सुविधायुक्त युनिक आयडी कार्ड मिळणार आहे. हे कार्ड देशात कोठेही चालणार आहे. सर्व सवलतीसाठी त्याचा वापर होणार असल्याची माहिती दिव्यांग व्यक्ती मार्गदर्शक संदिप घाडगे यांनी दिली.

दिव्यांगांना हे ऑनलाइन युनिक आयडी कार्ड मिळणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने सुरू झालेल्या या उपक्रमातील कार्डला दिव्यांग युनिक आयडी कार्ड, स्वावलंबन कार्ड, वैश्विक कार्ड अशी तीन नावे देण्यात आली आहेत. या आयडी कार्डच्या सुविधेतून ही माहिती पुढे येणार आहे. *दिव्यांगांना एस.टी, रेल्वे, विमान, व इतर सर्व शासकीय योजनांचा फायदा युनिक कार्डद्वारे नक्कीच मिळणार आहे*’ .
*’कार्ड एक – फायदे अनेक’ हे रंगीत कार्ड आधार कार्डप्रमाणे देशात एकच असणार आहे आधारकार्ड युनिक कार्डशी लिंक असेल. फोटोसह पूर्ण नाव, पत्ता, दिव्यांग प्रकार / टक्केवारी मोबाईल क्रमांकासह इतर माहिती कार्डवर असणार आहे*. दिव्यांग युनिकआयडी कार्डवर क्‍युअर कोड असणार आहे. दिव्यांगांना तो कोड स्कॅन करून आपली माहिती तपासून घेता येईल. त्यामुळे हे कार्ड म्हणजे दिव्यांगांसाठी एक महत्वाचा ऐवज ठरणार आहे.
संदीप घाडगे म्हणाले, केंद्र शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आमच्याकडे घरबसल्या युनिक कार्डसाठी सवलतीमधे ऑनलाइन नावनोंदणी सुरू आहे. तसेच युनिकआयडी ई-कार्ड आणि ई-प्रमाणपत्र काढून देत असून दिव्यांगांना युनिक फॉर्म अपलोड करण्यासाठी सेतू केंद्रामधे बराच वेळ वाया जात आहे.

त्याप्रमाणे ऑनलाईन माहिती भरणाऱ्या केंद्राकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत होती. दिव्यांग मार्गदर्शक संदिप घाडगे यांनी महाराष्ट्रातील दिव्यांगांना ही सुविधा सोप्या पध्दतीने शारिरीक व आर्थिक त्रास वाचविण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
आता दिव्यांगांना युनिक ओळखपत्रांसाठी अनेक कार्यालयांची उंबरठे झिजविण्याची गरज पडणार नाही. दिव्यांगांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या कार्डाची आवश्‍यकता लागत होती. यामधे एस. टी पास, रेल्वे पास आदी ठिकाणी दिव्यांगांना वेगवेगळी ओळखपत्र दाखवण्याची गरज पडत होती. युनिक कार्ड हे दिव्यांगांचे 21 प्रकारांचे प्रमाणही दर्शविणार आहे.

ऑनलाईन युनिक आयडी कार्ड फॉर्म भरल्यानंतर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे दिव्यांगांनी भरलेला फॉर्म आणि पावती दाखवून केंद्र शासनाचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र पोच घ्यावयाचे आहे. तसेच केंद्रशासन यांच्या कामकाजानुसार आपणाला ओरिजनल युनिक कार्ड पोस्टाद्वारे घरपोच मिळेल. कोणत्याही शासकीय योजनेची घाई करू नये. हे युनिक कार्ड नक्कीच मिळेल, याची दिव्यांगांनी नोंद घ्यावी.

युनिक कार्डवर दिव्यांगांना संपूर्ण देशात कोठेही लाभ घेता येणार आहे. यामुळे भारत देशातील दिव्यांगांची संख्या त्याची टक्केवारी आदी माहिती यानिमित्ताने एकत्रितरित्या येणार आहे. यासाठी आजच दिव्यांगांनी नवीन ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांग युनिकआयडी कार्डसाठी लागणारी वैयक्तीक माहिती फॉर्म प्रिंट काढून दिव्यांगाची वैयक्तिक अचूक माहिती भरावी,असे आवाहन करण्यात आले आहे.