GM NEWS , Breaking : जामनेर आगाराच्या बस आणि डंपरची धडक, बस चालकासह दोन प्रवासी जखमी .

0
1287

जामनेर दि .२९ ( सचिन तायडे ) : -जामनेर आगाराच्या जळगावला जाणार्‍या एस.टी.बस आणि डंपरचा केकतनिंभोरा   गावाजवळ अपघात झाल्याची  घटना दुपारी २.३० वाजे दरम्यान घडली . या अपघातामधे धडक दिल्या नंतर डंपर रोडवरच्या कड्याला जावून थांबले आहे. झालेल्या  या अपघाता मधे  बस चालकासह आणखी 2 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. याबाबत अधीक माहिती अशी की जामनेर आगाराची बस क्रमांक MH १४ BT १३३७ हि २.३०वाजेला जळगाव जायला निघाली. त्यानंतर सुमारे २.३५ वाजे दरम्यान या बसमधे आणि डंपर मध्ये धडक झाली.डंपर कड्याला जावून थांबल्याची घटना घडलीय.डंपर ने धडकल्याने बसचा चालकाच्या बाजुचा काही भाग पुर्णपणे चक्काचुर होवून तुटूलाय बस चालक यासह आणखी दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले झाल्याची माहिती मिळाली आहे . अपघातामधे जखमी झालेल्यांना लागलीच जामनेर येथे उपपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + 8 =