GM NEWS:दिलासादायक वृत्त : जांभूळ येथील सर्व २१ अहवाल निगेटिव्ह . डॉ . हर्षल चांदा यांची माहीती . तरीही काळजी घेण्याचे आवाहन .

0
281

पहूर , ता जामनेर दि . २९ ( शंकर भामेरे ) जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील सर्व २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी डॉ .हर्षल चांदा यांनी दिली .
जांभूळ येथील कामगार जळगाव येथे पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील २१ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते . सदर अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे जांभूळ परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .
दरम्यान नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .