GM NEWS, प्रेरणादाई वृत्त: जळगांव जिल्ह्यात मराठा समाज वधू वर परिचय ऑनलाईन मेळावा ५ जुलै रोजी होणार . मराठा सोबती डॉट कॉम संकेतस्थळावर ३ जुलै पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन .

0
581

जामनेर,दि.२९ जुन ( मिलींद लोखंडे ) :-

मराठा सोबती डॉट कॉम तर्फे जळगाव जिल्ह्यासाठी सकल मराठा ऑनलाईन वधू वर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. ५ जुलै २०२० रविवार रोजी दुपारी १२ वाजेपासून हा मेळावा मोबाईल अॅप द्वारा होणार आहे.
सध्या कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे विवाह स्थळं बघणे कठीण झालेले आहे.अश्या परीस्थितीत ऑनलाईन मेळावा उपयुक्त ठरणार आहे.जास्तीत जास्त लग्न या माध्यमातून जुळावेत यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठा सोबती डॉट कॉम ( www.Marathasobati.com ) या वेबसाईट वर नोंदणी करून प्रिमिअम मेंबरशिप घेणाऱ्या सभासदाला या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.एकदा वेबसाईट चे प्रिमिअम सभासद झाल्यावर २ वर्षापर्यंत वेबसाईट वरील स्थळे सभासद बघू शकता व या २ वर्षात होणाऱ्या मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ शकता.नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३ जुलै २०२० पर्यंत आहे.मेळाव्यात घरबसल्या मोबाईलवरून सहभागी होऊ शकता. तसेच हेडफोन असणे आवश्यक आहे.मेळाव्यात वधू / वर व पालक उपस्थित असणे अनिवार्य आहे.नोंदणी झाल्यावर अॅप विषयी सविस्तर माहिती व्हाॅट्सपवर पाठविण्यात येणार आहे.मेळावा झाल्यावर ५ दिवसांनी पसंत स्थळाचे डीटेल्स व्हाॅट्सपवर पाठविण्यात येणार आहे.मेळावा फक्त जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजासाठी आहे.मेळावा मर्यादित सभासदांसाठी आहे.( २५० सभासद ) , संख्या जास्त झाल्यास त्याच दिवशी किंवा लवकरच दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
या मेळाव्यात उच्चशिक्षित सोबतच सर्व क्षेत्रातील समाज बांधव सहभागी होऊ शकता.यात प्रथम वधू-वर,घटस्फोटीत,विधवा,विधुर सहभागी होऊ शकता.अधिक माहितीसाठी 9854433344 या मराठा सोबती च्या व्हाॅट्सप क्रमांकावर मेसेज किंवा संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.