मित्रानेच कापला मित्राचा गळा , भुसावळ शहरातील थरारक घटना झाली CCTV कॅमेऱ्यात कैद .

0
1193

भुसावळ दि. ३१ ( प्रतिनिधी ) :- येथील पांडुरंग टॉकीज जवळील खान्देश हॉटेलमध्ये काउंटर वर दारू पित असतांना दोन जणांमध्ये शाब्दिकवाद झाला असल्याच्या कारणावरून कटरच्या ब्लेडने विकास साबळे यांच्या गळ्याच्या नसा कापल्यामुळे जागीच मयत झाल्याची घटना रात्री 10:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर रोड वरील पांडुरंग टॉकीज जवळील खान्देश हॉटेलमध्ये परमिट रूम मध्ये निलेश ताकते राहणार कॉसमॉस बँक जुना सातारा आणि  विकास साबळे वय 36 राहणार गंगाराम प्लॉट हे दोन मित्र रेल्वे कर्मचारी मित्र खान्देश हॉटेलमध्ये दारू पित असतांना यांच्या मध्ये काही शाब्दिक वाद झाला . त्यांच्या मधे चालेल्या किरकोळ  कारणावरून हॉटेलच्या कॉऊंटरवरच  धारधार कटरने निलेश ताकते याने विकास साबळे यांचा गळ्याच्या नसा कापल्याने तो जागीच मयत झाला आहे .  आरोपी निलेश ताकते याला बाजारपेठ पोलीसांनी CTV फुटेजच्या आधारावर तात्काळ अटक केली असुन  घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी भेट देऊन झालेल्या घटनेची पाहणी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here